Narayan Rane And Shankaracharya After The Statement About Shankaracharya, Narayan Rane Said Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Narayan Rane and Shankaracharya : राम मंदिर (Ram Mandir) एवढ्या वर्षांनंतर होत आहे, याचे त्यांना कौतुक नाही. हे आत्तापर्यंत कोणीही करु शकले नाही. हा विषय कोणीही घेतला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आणि भारतीय जनता पक्षाने हा विषय घेतला. मंदिर होत आहे तर शंकराचार्यांनी शुभेच्छा द्याव्यात की त्याच्यावर टीका करावी? समाधान आहे. शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी त्यांचे योगदान काय आहे? ते सांगावे, असा सवाल भाजप खासदार नारायण राणे यांनी आज (दि.13) केला आहे. दरम्यान, काही तासांत नारायण राणे यांनी आपल्या वक्तव्याबाबत घुमजाव केला आहे. 

घुमजाव करताना काय म्हणाले नारायण राणे? 

मी तसं बोललो नाही. मात्र, पत्रकारांनी त्याचा वेगळा अर्थ काढला. मी राणे आहे. मी वादाला घाबरत नाही. मागील साठ वर्षांपासून वादातूनच मी इथपर्यंत पोहचलो आहे, असे भाजप खासदार नारायण राणे म्हणाले

कशामुळे चर्चेत आले शंकराचार्य? (Shankaracharya)

रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रमात शंकराचार्य सहभागी होणार नसल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. या प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रम हा हिंदू धर्मातील शास्त्र, विधींनुसार होत नसून त्याचे उल्लंघन करणारा असल्याचा आक्षेप स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी घेतला आहे. त्यानंतर शंकराचार्य चर्चेत आले आहेत.  

शंकराचार्य कोण असतात? (Shankaracharya)

धर्मानुसार पाहिले तर आद्य शंकराचार्यांनी मठांची स्थापना केली होती. ते हिंदूना दिशा दाखवणारे आणि धर्मगुरु होते. त्यांना जगदगुरु म्हणून देखील ओळखले जाते. शंकराचार्य सनातन धर्माची सुरक्षा आणि धर्माचा प्रसार करु इच्छित होते. त्यासाठी त्यांनी देशातील चार वेगवेगळ्या दिशांमध्ये स्थापन केलेल्या मठांची जबाबदारी त्यांच्या 4 शिष्यांवर सोपवली. या मठांच्या प्रमुखांना शंकराचार्य असे म्हटले जाते. सनातन धर्मात शंकराचार्यांना सर्वोच्च मानले जाते. 

मठांचे स्वरुप कसे असते? (Shankaracharya)

सनातन धर्मानुसार, मठात गुरु आपल्या शिष्यांना सतातन धर्माचे शिकवण आणि ज्ञान देतात. हे अध्यात्मिक शिक्षण असते. या शिवाय, मठात आयुष्याचे काही महत्वाचे पैलू, समाजाची सेवा आणि साहित्य यांचे ज्ञान दिले जाते. मठ हा असा शब्द आहे, ज्याला बहुधार्मिक अर्थ आहेत. भारतात सध्या द्वारका, ज्योतिष, गोवर्धन आणि श्रृंगेरी असे प्रमुख चार मठ आहेत. संस्कृतमध्ये मठांना पीठ असे म्हटले जाते. 

शंकराचार्यांची निवड कशी होते? (Shankaracharya)

शंकराचार्य या पदावर विराजमान होण्यासाठी व्यक्ती संन्यासी, वेदांत ब्राम्हण, ब्रह्मचारी असायला हवा. या शिवाय, संस्कृत, चतुर्वेद आणि पुराण या सर्वांचे ज्ञान असणे, अभ्यास असणेही महत्वाचे आहे. याशिवाय, त्या व्यक्तीने आपल्या जीवनात मुंडन, पिंडदान केलेले असावे. त्यानंतर रुद्राक्ष परिधान करणे महत्वाचे मानले. जाते. शंकराचार्य होण्यासाठी ब्राम्हण असणे अनिवार्य आहे. ज्यांना शंकराचार्य बनायचे आहे. त्यांनी आचार्य महामंडलेश्वर आणि प्रतिष्ठित संतांच्या सभेची सहमती घ्यावी लागते. याशिवाय विद्वत परिषदेची मान्यताही असायला हवी. त्यानंतर शंकराचार्य ही पदवी मिळते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Shankaracharya and Ram Mandir : शंकराचार्य कोण असतात? त्यांचे हिंदू धर्मातील महत्व किती, निवड कशी होते? सध्या शंकराचार्य कोण आहेत? जाणून घ्या…

[ad_2]

Related posts