[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Android Cyber Crime : तुम्ही देखील Android स्मार्टफोन युजर असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम म्हणजेच CERT-In ने Android 14 आणि जुन्या Android व्हर्जनच्या मोबाईल युजर्ससाठी धोका व्यक्त केला आहे. तुमची खासगी माहिती चोरू शकतात आणि तुमच्या डिव्हाइसवर पूर्ण नियंत्रण मिळवू शकतात. त्यामुळे आता अनेकांची खासगी माहिती सायबर भामट्यांच्या हाती जाण्याची शक्यता आहे.
या स्मार्टफोन्सचा धोका!
Android व्हर्जन 11, 12, 12L, 13 किंवा 14 वर चालणारे कोणतेही डिव्हाईस सध्या मोठ्या धोक्यात आहे. यामध्ये Samsung, Google Pixel, OnePlus, Xiaomi, Oppo आणि अनेक लोकप्रिय स्मार्टफोन्सचा समावेश आहे.
स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे
तुमचा Android स्मार्टफोन हॅकर्सपासून वाचवण्यासाठी, CERT-IN ने काही टिप्स दिल्या आहेत. यातून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमचे डिव्हाइस शक्य तितक्या लवकर अपडेट करणे. फोन अपडेट करत राहिल्यास आपला डेटा सुरक्षित राहतो.
आटोमेटिक अपडेट चालू करा
तुमचे डिव्हाईस आटोमेटिक अपडेट पर्याय देत असल्यास ते शक्य तितक्या लवकर चालू करा. याद्वारे सिक्युरिटी पॅच उपलब्ध होताच तो आपोआप डाउनलोड आणि इंस्टॉव होईल. ज्यामुळे तुम्ही अशा धोक्यांपासून दूर राहू शकता.
थर्ड पार्टी अॅप्स टाळा
कोणतेही अॅप्स इन्स्टॉल करताना काळजी घ्या. केवळ Google Play Store सारख्या रिलाएबल सोर्स अॅप्स द्वारे इंस्टॉल करा. थर्ड पार्टी वेबसाइट किंवा अॅप स्टोअरमधून अॅप्स डाउनलोड करू नका. थर्ड पार्टी अॅप्स सगळ्यात धोकादायक असल्याचं सायबर एक्सपर्ट सांगतात.
सॉफ्टवेअर अपडेट न करण्याचे तोटे
सॉफ्टवेअर वेळेवर अपडेट करा. आजकाल फोन सुरक्षेकडे बरेच लक्ष दिले जात आहे, कारण स्मार्टफोनमध्ये युजर्सचा महत्वाचा आणि वैयक्तिक डेटा असतो. जर तुम्ही सॉफ्टवेअर वेळेवर अपडेट केले नाही तर तुमच्या फोनची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. तुमच्या स्मार्टफोनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान नसल्यामुळे हॅकर्स तुमचा फोन सहज हॅक करु शकतात. त्यामुळे आता जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये सॉफ्टवेअर अपडेट नोटिफिकेशन मिळेल, तेव्हा तुम्हाला ते लगेच अपडेट करावे लागेल.
इतर महत्वाची बातमी-
Great Republic Day Sale 2024 : Motorola razr 40 ultra फोनवर थेट 50 हजारपर्यंतची सूट; Republic Day Sale मध्ये फोनवर तुफान ऑफर्स
Xiaomi 14 Ultra :सगळ्या लेटेस्ट स्मार्टफोनला टक्कर देणार Xiaomi 14 Ultra; भारतात लवकरच लाँच होण्याची शक्यता, फिचर्स आले समोर
[ad_2]