Weather Update Imd Prediction Heavy Rainfall October 18 Forecast Marathi Updates

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Weather Update Today : देशात (India Weather Today) काही भागात ऊन (Heat) तर काही भागात पाऊस (Rain) पाहायला मिळत आहे. काही राज्यांमध्ये थंडीची चाहूलही लागली आहे. देशाच्या काही भागातून मान्सूनने माघार घेतली असली, तरी देशाच्या काही भागांतून अद्याप मान्सून पूर्णपणे (Monsoon Return) माघारी परतलेला नाही. केरळ, तामिळनाडू राज्यांमध्ये गेल्या 24 तासांत जोरदार पाऊस झाला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आज म्हणजेच बुधवारी, 18 ऑक्टोबरला राजस्थान, पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश आणि गोव्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.

पूर्व आणि ईशान्य भारतातून मान्सूनची माघार

संपूर्ण पूर्व आणि ईशान्य भारतातून मान्सून माघारी परतला आहे. आंध्र प्रदेशचे आणखी काही भाग आणि तेलंगणाचे उर्वरित भागातूनही मान्सूनने माघार घेतली आहे. मंगळवारी नैऋत्य मान्सूनने बिहार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि उर्वरित भागांतून माघार घेतली आहे. सिक्कीम, संपूर्ण ईशान्य भारत, उत्तर बंगालच्या उपसागराचा बहुतांश भाग, बंगाल आणि आंध्र प्रदेशातून मान्सून माघारी परतला आहे.

कुठे पाऊस पडेल?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, लडाख, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पुढील 2 दिवस पावसाळी वातावरण दिसून येईल. हिमाचल प्रदेशातील शिमला येथील नारकंडा आणि खडा पाथरमध्ये या महिन्यातील पहिली बर्फवृष्टी पाहायला मिळाली. याशिवाय कुल्लूच्या उंच भागात तापमान शून्याच्या खाली गेलं आहे. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळतील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. ठाणे, मुंबईत उकाडा जाणवणार आहे.

पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत

पीटीआय एजन्सीच्या वृत्तनुसार, केरळमध्ये गेल्या 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात पाणी साचलं होतं. तिरुअनंतपुरममध्येही पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यातील अनेक भागात पाणी साचल्याने संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता आहे, यामुळे सरकारने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

पर्वतीय भागात बर्फवृष्टीमुळे थंडी वाढली

डोंगराळ भागात हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने सांगितले की, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या शिखर भागात हलकी बर्फवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. पर्वतीय राज्यांमध्ये बर्फवृष्टीमुळे थंडी वाढली आहे.

‘या’ राज्यात पावसाची शक्यता

याशिवाय देशातील अनेक राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने सांगितले की, राजस्थान, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. यासोबतच कर्नाटक आणि तामिळनाडूच्या किनारी भागातही पावसाची शक्यता आहे.



[ad_2]

Related posts