Tata Is Ipl Main Sponsor Tata Group Bids 2500 Cr To Continue As Ipl Title Sponsor For Next 5 Years Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Tata Group IPL Title Sponsor : टाटा समूह (Tata Group) पुढील पाच वर्षे आयपीएलचा (IPL 2024) टायटल स्पॉन्सर (Tata Group IPL Sponsor) राहणार आहे. टाटा सन्सने (TATA Sons) 2028 पर्यंत आयपीएल टायटल स्पॉन्सरशिप (IPL Title Sponsorship) मिळवली आहे. या कालावधीत टाटा समूह बीसीसीआयला दरवर्षी 50 कोटी रुपये देणार आहे. टाटा सन्सने आयपीएल 2024 ते 2028 च्या टायटल प्रायोजकत्वासाठी (IPL Title Sponsor) दरवर्षी 500 कोटी रुपये म्हणजेच एकूण 2500 कोटी रुपयांची बोली लावली आहे. टाटा समूह पुढील पाच वर्षांत बीसीसीआयला आयपीएल टायटल स्पॉन्सरशिपसाठी 2500 कोटी रुपये देणार आहे.

आयपीएल स्पॉन्सरशिप टाटा समुहाकडेच

मीडिया रिपोर्टनुसार, या आयपीएल टायटल स्पॉन्सरशिपच्या स्पर्धेत टाटासह आदित्य बिर्ला समूह होती, असं सांगितलं जात आहे. टाटाने लावलेली बोली आदित्य बिर्ला समूहाच्या बोलीशी जुळत होती असंही समोर आलं आहे. आता मीडिया रिपोर्टनुसार, या स्पर्धेत टाटाने बाजी मारली आहे. टाटा सन्स (TATA Sons) भविष्यात या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचा टायटल स्पॉन्सर म्हणून कायम राहणार असल्याचं समोर आलं आहे. टाटाने 2028 पर्यंत आयपीएल टायटल स्पॉन्सरशिप मिळवली आहे. या कालावधीत टाटा समूह बीसीसीआयला दरवर्षी 500 कोटी रुपये देणार आहे.

बीसीसीआयला दरवर्षी मिळणार 500 कोटी

गेल्या वर्षी 12 डिसेंबर रोजी बीसीसीआयने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (IPL) प्रायोजकत्वासाठी (IPL Title Sponseship) निविदा (Tendor) जारी केली होती. 14 जानेवारी रोजी आदित्य बिर्ला समूहाने यासाठी 2500 कोटी रुपयांची बोली लावली होती. त्यानंतर टाटा समूहाने हीच बोली लावण्याचा निर्णय घेतल्याची बातमी शुक्रवारी संध्याकाळी आली.

टायटल स्पॉन्सरशिपच्या किमती का वाढल्या?

टाटा समूह गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलचा प्रायोजक आहे. गेल्या दोन वर्षात म्हणजेच आयपीएल 2022 आणि 2023 मध्ये प्रायोजकत्वासाठी टाटा समुहाने बीसीसीआयला 670 कोटी रुपये दिले. आता आयपीएलसाठी टायटल स्पॉन्सरशिपची रक्कम वाढली आहे. आयपीएल टायटल स्पॉन्सरशिपच्या किमती वाढण्यामागचं मुख्य कारण म्हणजे आयपीएलची वाढती क्रेझ आहे, याशिवाय येत्या सीझनमध्ये आयपीएल मॅचेसची संख्याही वाढवण्यात येणार आहे.आयपीएल 2024 मध्ये एकूण 74 सामने होणार आहेत. यानंतर, बीसीसीआयने आयपीएल 2025 मध्ये ते 84 सामने आणि नंतर आयपीएल 2026 पासून 94 सामने वाढवण्याची बीसीसीआयची योजना आखली आहे.

मार्चमध्ये आयपीएलचा रणसंग्राम

बहुप्रतिक्षित आयपीएलचा आगामी हंगाम 21 मार्च महिन्यापासून सुरु होण्याची शक्यता आहे. त्याधी वूमन्स आयपीएल होईरल. लोकसभा निवडणुकीनंतर आयपीएल 2024 भारतातच खेळवली जाण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Related posts