[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
शपथ घेतलेल्या मंत्र्यांमध्ये २३ आमदारांव्यतिरिक्त सध्या विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य नसलेल्या एन. एस. बोसेराजू यांना स्थान देऊन काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ‘बोसेराजू माजी आमदार व विधान परिषदेचे माजी सदस्य असून, ते अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव आहेत. मूळचे रायचूरचे असलेले बोसेराजू काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी शुक्रवारी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले,’ असे एका नेत्याने सांगितले.
दरम्यान, चार वेळा आमदार राहिलेल्या व सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारमध्ये मंत्री असलेल्या एम. कृष्णप्पा यांच्यासारख्या मंत्रिपद नाकारण्यात आलेल्या आमदारांच्या समर्थकांनी त्यांच्यासाठी मंत्रिपदाची मागणी करणारे फलक हातात घेऊन शपथविधी समारंभावेळी घोषणाबाजी केली.
कर्नाटक सरकारमध्ये ३४ मंत्री असू शकतात. यापैकी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह १० जणांनी २० मे रोजी शपथ घेतली होती. राज्यात सर्व मंजूर मंत्रिपदे भरल्याची उदाहरणे दुर्मीळ आहेत, असे एका काँग्रेस पदाधिकाऱ्याने सांगितले.
[ad_2]