Rinku Singh Fathers Viral Video Seen Delivering Lpg Cylinders In Video Intermet

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rinku Singh Father’s Viral Video : भारताचा युवा फिनिशर रिंकू सिंह याच्या वडिलांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामध्ये त्याचे वडिल गॅस सिलिंडरची डिलिव्हरी करताना दिसत आहेत. मुलगा टीम इंडियात क्रिकेट खेळतोय. आयपीएलमध्ये धमाल करतोय, भारतामध्ये त्याचे शेकडो चाहते आहेत. तरीही वडिलांनी आपलं काम सोडलं नाही, ते आजही सिलिंडर गॅसची डिलिव्हरी करतात. चाहत्यांनी रिंकू सिंह यांच्या वडिलांना सलाम केलाय. चाहत्यांकडून हा व्हिडीओ शेअर कऱण्यात येतोय.  

रिंकूकडून खुलासा – 

मागील काही दिवसांपूर्वी रिंकू सिंह याने वडिल आजही आपलं आधीचं काम करत असल्याचे सांगण्यात आले होते. ते आजही घरोघरी जाऊन एलपीजी गॅस सिलिंडरची डिलिव्हरी करतात, असे रिंकू म्हणाला होता. रिंकूने वडिलांना आता हे काम करण्याची गरज नाही, तुम्ही आराम करा, असे सांगितलं होतं. पण   वडिलांनी आजही आपला व्यवसाय सोडला नाही.  

 

कोचिंग सेंटरवर लादी पुसण्याची नोकरी 

रिंकूचा संघर्ष केवळ बॅट आणि बॉल इतका मर्यादित नव्हता. रिंकूने आपल्या वयाच्या विविध टप्प्यांवर खूप संघर्ष केला आहे. त्याने एका कोचिंग सेंटरवर लादी (फरशी) पुसण्याचं कामही केलं आहे. त्याच्यासाठी ती नोकरी होती. “एका कोचिंग सेंटरवर मला लादी पुसण्याची नोकरी मिळाली होती. सकाळी-सकाळी जाऊन लादी पुसावी लागायची. माझ्या भावानेच मला ही नोकरी मिळवून दिली होती. मी ही नोकरी करु शकलो नाही. काही दिवसात ही नोकरी सोडून दिली. मी अभ्यासातही तितका हुशार नव्हतो. त्यामुळे क्रिकेट हेच माझं ध्येय होतं. मला क्रिकेटच पुढे घेऊन जाऊ शकतं हे मी मनोमन ठरवलं. माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. 

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धगधगती कारकीर्द

रिंकू सिंहची फर्स्ट क्लास (प्रथम श्रेणी) क्रिकेटची कारकीर्द तितकीच धगधगती आहे. त्याने आतापर्यंत 40 फर्स्ट क्लास, 50 लिस्ट ए आणि 78 टी 20 सामने खेळले आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने  सात शतकं आणि 19 अर्धशतकं ठोकली आहेत. नाबाद 163 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. याशिवाय लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 53 च्या सरासरीने 1749 धावा कुटल्या आहेत. तर टी 20 सामन्यात रिंकूने 6 अर्धशतकांच्या जोरावर 1392 धावा चोपल्या आहेत. 



[ad_2]

Related posts