( प्रगत भारत । pragatbharat.com)
Poet Died Of Heart Attack: हार्ट अॅटेकच्या प्रकरणात वाढ होताना दिसत आहे. त्यातच तरुणांमध्येही हार्ट अॅटेकचे प्रमाण वाढले आहे. नाचताना, गाताना, जिम मध्ये, खेळत असताना हार्ट अॅटेक येऊन मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यासंदर्भात व्हिडिओही समोर आले आहेत. असाच एक प्रकार उत्तराखंड येथील उधम सिंह नगर येथून समोर आला आहे. कविता वाचन करत असतानाच अचानक एका कवी खाली कोसळतो. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
उधम सिंह नगरमध्ये पंतनगर कृषी विश्वविद्यालय येथे डॉ. बीबी सिंह सभागारमध्ये काव्य महोत्सव सुरू होता. त्याचे आयोजन राष्ट्रीय स्वयं सुरक्षा अभियानकडून भारतीय वीर जवानांच्या सन्मानासाठी करण्यात आले होते. यात अनेक कवींनी सहभाग नोंदवला होता. याच कार्यक्रमात पंतनगर येथील रहिवाशी सुभाष चतुर्वेदी कविता वाचन करत होते.
कवि सुभाष यांनी कवितेच्या काही ओळी वाचल्या असतीलच की अचानत ते खाली कोसळले. सुभाष चतुर्वेदी खाली कोसळल्यानंतर त्यांना तातडीने महाविद्यालयातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथेून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगितले गेले. मात्र, तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
28 जानेवारी रोजी हा सर्व प्रकार घडला आहे. कुटुंबीयांना हा सर्व प्रकार घडल्यानंतर ते त्यांना त्यांच्या मुळ गावी मथुरा येथे घेऊन गेले. सुभाष चतुर्वेदी यांनी 1974 साली पंतनगर येथे सहाय्यक लेखाकार पदावर नियुक्त झाले होते. 2014 नंतर ते विवि पदावरुन निवृत्त होऊन जवाहर नगरमध्ये घर बांधले आणि तिथे स्थायिक झाले. ते त्यांच्या मुलासह विश्वविद्यालय परिसरात कँटीन चालवत होते.
पंतनगर काव्य महोत्सव में कवि को हार्टअटैक आया।
उधमसिंह नगर, उत्तराखंड pic.twitter.com/CET9TYOcde— Sachin Gupta (@SachinGuptaUP) January 29, 2024
या घटनेवर एसपी मनोज कत्याल यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसांना ही माहिती मिळाली होती. कवि संमेलनमध्ये कवी कवितेचे वाचन करत असताना त्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. कुटुंबीय त्यांचा मृतदेह घेऊन मथुरा येथे गेले आहेत.
हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच असाच एक प्रकार हरियाणातील भिवानी येथे घडला आहे. रामलीलामध्ये काम करत असताना हनुमानाची भूमिका करणाऱ्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला.