Raj Thackeray criticized says NCP s sharad pawar and ajit pawar are all the one and same MNS Sabha in Nashik maharashtra Marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Raj Thackeray in Nashik : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Speech) यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) गट आतून एकच असल्याचा दावा केला आहे. शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) गट बाहेर वेगळे, पण आतून सगळे एकच आहेत, असा मोठा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. मनसेच्या 18 व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये जनसंबोधन केलं. या भाषणात राज ठाकरेंनी सर्वच राजकीय पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे.

बाहेर वेगळे, पण आतून सगळे एकच

राज ठाकरे यांनी म्हटलं की, राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते भेटण्यासाठी आले होते. सांगताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असं सांगितलं म्हणून कोणत्या गटाचे विचारले तर, तीन शरद पवार, दोन अजित पवार गटाचे होते, पण भेटायला मात्र एकत्र आले होते. माझे ठाम मत आहे, हे सर्व आतून एक आहेत, असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.

‘पवार हेच करत आलेत’

राज ठाकरे यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षावरही टी केली आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही. निवडून येणाऱ्या माणसाची मोळी आहे. शरद पवार हेच करत आलेत. ते वेगळे झाले तरी निवडून येणार, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

‘अरबी समुद्रात शिवरायाचं स्मारक अजून का झालं नाही’

विरोधक म्हणतात सुरुवात करतात शेवट करत नाही, या आरोपांवर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक अजून का झालं नाही. पंतप्रधान आले फुलं वाहून गेले, त्या फुलांंचं काय झालं. पण त्या वेळेत वल्लभभाई पटेल याचा पुतळा उभा राहिला. मनसे सुरू करते तसा शेवटही करते. आमची भूमिका स्वच्छ प्रामाणिक होती आहे. प्रार्थना स्थळावरील भोंगे काढले. प्रार्थना करू नका, असं आम्ही म्हणत नाही, पण भोंग्यांचा आवाज बंद झाला, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

‘माझ्या हातात सरकार द्या सर्व भोंगे काढतो’

डरपोक सरकार आहे. मुस्लिम समाजातील लोकांनाही त्रास होतो. माझ्या हातात सरकार द्या सर्व भोंगे काढतो. समुद्रात दर्गा बांधला, तो एका रात्रीत काढला. प्रार्थना करू नको असे आम्ही म्हणतो का, एका जातीचा प्रश्न नाही, प्रत्येक राज्यातील पजातीचा प्रश्न आहे. 

येणाऱ्या पिढीला पुतळे दाखविणार का?

अरबी समुद्रातील शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्याचा विषय आला, तेव्हा मी सांगितले असं होणार नाही. समुद्र आहे, तिथे भर घालण्यासाठी किमान 25 ते 30 हजार कोटी लागतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले गड किल्ले स्मारक आहे. येणाऱ्या पिढीला पुतळे दाखविणार का, असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. गड-किल्ले उभे राहिले तर इतिहास दाखवू शकू, असंही त्यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे काय म्हणाले? पाहा संपूर्ण भाषण

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts