पिंपरी ;संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे येथे काल गुरुवारी दि 22 ऑगस्ट रोजी पुणे गृह निर्माण मंडळाचे नव निर्वाचित अध्यक्ष मा. खासदार श्री. शिवाजीरावदादा आढळराव पाटील यांचा भव्य नागरी सत्कार सर्व सामाजिक तसेंच गणेशोत्सव, दुर्गाउत्सव मंडळे तसेच विविध सोसायटी यांचे वतीने कामगार नेते मा. नगरसेवक श्री. यशवंतभाऊ भोसले यांचे हस्ते करण्यात आला.या वेळी प्रचंड संख्येने जनसमुदाय उपस्थित झालेला होता.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे मूर्तीस पुष्प अर्पण करून कार्यक्रमास सुरवात झाली.म्हाडाचे वसाहतीची स्थापना झाले पासून गेल्या चाळीस वर्षात संत तुकाराम नगर वसाहतीला भेट देणारे श्री. शिवाजीरावदादा आढळराव पाटील हे पहिलेच म्हाडाचे अध्यक्ष आहेत, त्या मुळे येथील शेकडो रहिवाशांनी उपस्थित राहून त्यांचे कौतुक केले व आभार मानले.प्रमुख अतिथी म्हणून मा.खासदार श्री.अमरजी साबळे, म्हाडाचे मुख्याधिकारी श्री.अशोकराव पाटील,मिळकत व्यवस्थापक विजयजी ठाकूर अधिकारी प्रकाशजी वाबळे तसेंच प्रा.श्री.दत्तात्रय भालेराव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.महाराष्ट्रातील कामगारांचे प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालले असून, कायम कामगारांचे जागेवर सुरु असलेल्या कंत्राटी पद्धतीमुळे राज्यातील करोडो तरुणांचे आयुष्य उध्वस्त होत आहे,कोविड महामारीत अनेक कामगारांच्या नोकऱ्या गेल्या, राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचे वतीने आम्ही लढे देत आहोत, परंतु संविधानाने दिलेल्या अधीकारा नुसार युनियन करताच कामगारांना कामावरून काढून टाकले जाते, माननीय न्यायालय न्याय देते त्याची अंमलबजावणी उद्योजक तर करत नाहीतच परंतु पालिकेतील आयुक्त, जिल्हाधिकारी देखील करत नाहीत, तरी राज्याचे मा.मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांचेकडे या विधानसभा निवडणुकीपूर्वी बैठक लावून कामगारांचे प्रश्न सोडवावेत अशी प्रमुख मागणी पीडित कामगारांच्या वतीने या वेळी श्री. यशवंतभाऊ भोसले यांनी केली.संत तुकाराम नगर मधील म्हाडाच्या घराच्या प्रमुख मागण्या 1 ) अत्य अल्प उत्पन्न गटातील LIG ची इमारत क्रमांक 197 ते 213 मधील 947 घराणमधील मोडकळीस आलेल्या घरांचे पुनर्वीकास Redevelopment करणे त्यांना दोन बेडरूम किचन व हॉल असे किमान 1100 स्कवेअर फूट चे घर द्यावे.2 ) इतर स्कीम मधील स्वतः रहिवाशांनी बांधलेल्या घरांना वाढीब बांधकामांना मान्यता देऊन या घरांवर बँकेचे लोन काढण्यासाठी ना हरकत म्हाडाने द्यावी.3 ) घराच्या मूळ किमतीवर 2% रक्कम घेऊन रिसेलरचे नावावर घर करून द्यावे.4 ) गळत असलेल्या म्हाडाच्या इमारती त्वरित दुरुस्त करून द्याव्यात.5 ) व्यापारी संकुल चे पुनर्वीकास करावा अशी मागणी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. किरण सुवर्णा यांनी अध्यक्ष यांचेकडे स्थळ पाहणीचे वेळी केली.6) छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्णकृती पुतळ्यासाठी महेशनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकशीजारील शिवजयंती साजरा होते त्या स्थळावर करावी अशी मागणी सौं. सुजाताताई पलांडे, सुनील पलांडे आणी यशवंतभाऊ भोसले यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी या वेळी म्हाडाचे अध्यक्ष व मुख्याधिकारी यांकडे केली, लवकरच शासनाची मान्यता घेऊन म्हाडा परवानगी देईल अशी घोषणा अध्यक्ष यांनी केली.
वरील महत्वाचे विषय श्री.यशवंतभाऊ भोसले यांनी आपल्या प्रस्तावित भाषणात मांडले त्या प्रश्नांबाबत लवकच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन आपल्या भाषणात म्हाडाचे अध्यक्ष श्री.शिवाजीरावदादा आढळराव पाटील साहेब यांनी दिले, प्रचंड संख्येने जनसमुदाय जमल्याचे पाहून दादा भारावून गेले होते त्यांनी येथील रहिवाशांच्या एकजुटीचे कौतुक करून केलेल्या सत्काराबद्धल आनंद व्यक्त केला,या कार्यक्रमाचे दोन दिवसात एवढे उत्तम नियोजन केल्याबद्धल यशवंतभाऊ भोसले व त्यांचे सहकाऱ्यांचे, तसेंच सर्व स्थानिक मंडळाचे शिवाजीराव आढळराव दादांनी कौतुक केले. प्रदीर्घ तीस वर्षांच्या कामगार चळवळीतील श्री. यशवंत भोसले यांच्या कार्याचा या कार्यक्रमात गौरव केला.मा. खासदार श्री.अमरजी साबळे साहेब यांनी देखील श्रमिकांच्या घरांच्याबाबतीत आलेल्या वरील मागण्या कार्यक्षम व्यक्तिमत्व असलेले मा.खासदार व माझे एकेकाळचे संसदेतील सहकारी संसदरत्न व गृहनिर्माण मंडळाचे नूतन अध्यक्ष श्री. शिवाजीरावदादा आढळराव पाटील लवकर पूर्ण करतील असा निर्धार व्यक्त केला.खा. अमर साबळे साहेब यांनी आपल्या भाषणात संत तुकाराम नगर चे म्हाडा चे घरांकरिता यशवंतभाऊ भोसले यांनी दिलेले लढे तसेच कामगार हितासाठी केलेल्या अनेक लढ्यांची सविस्तर आपल्या शैलीत माहिती दादांना व मान्यवर उपस्थितांना दिली, या वेळी श्री. यशवंत भाऊ भोसले यांचे कौतुक करून त्यांना त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.येथील रहिवासी व उद्योजक संघटनेचे अध्यक्ष श्री.जयदेव अक्कलकोटे यांनी सूत्रसंचालन केले, स्थानिक नेते श्री.नंदुअप्पा कदम यांनी आभार मानले.
या प्रसंगी श्री.सदाशिवराव खाडे,मा.नगरसेवक श्री.बबनराव गाडवे,ऍड.अतुल गुंजाळ सर ,दिपकशेठ पाटील,दिनेश भाऊ पाटील,राहूल शितोळे,मिलिंद देशपांडे, दत्तात्रय गायकवाड, रामचंद्र देवकर,अमोल घोरपडे, अजय पवार,सुरेश इंगळे, श्रीमती लताताई पाटील, रिबेकाताई अमोलिक,रजनी ताई मगर,प्रियाताई जाधव घोरपडे , मानसीताई देशपांडे इत्यादी स्थानिक प्रमुख कार्यकर्ते तसेंच सर्व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते, राष्ट्रीय श्रमिक आघाडी चे सभासद व कामगार प्रतिनिधी देखील या प्रसंगी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.