पुणे, दि. २७:(pragatbharat.com ) पुणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून डॉ. रवींद्र ठाकूर यांनी पदभार स्वीकारला. यावेळी मावळते जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांनी त्यांचे स्वागत करून पदभार सोपवला. डॉ. रवींद्र ठाकूर हे मूळ नाशिकचे असून त्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून वृत्तपत्र विद्या शाखेत पदव्युत्तर पदवी संपादित केली आहे. त्यांनी जनसंपर्क क्षेत्रात पी.एच.डी. केली आहे. तसेच त्यांनी वृत्तपत्र क्षेत्रात अध्यापनाचे कामही केले असून सुरुवातीला दैनिक जनशक्ती, देशदूत या वृत्तपत्रात पत्रकारिता केली आहे. जनसंपर्क अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ते २००७ मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सेवेत दाखल झाले असून…
Read More