रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेपूर्वी मोदी करणार 11 दिवसांचा विशेष धार्मिक विधी; स्वत: केली घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी एक ऑडिओ मेसेज जारी केला आहे. यामध्ये त्यांनी 11 दिवसांचा विशेष विधी सुरू करत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आजपासून  पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 11 दिवसांच्या विशेष अनुष्ठानाला सुरुवात करत आहेत. पंतप्रधान म्हणाले की मला या शुभ सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य आहे. यासोबत त्यांनी जारी केलेल्या ऑडिओ मेसेजमध्ये जिजाऊंचा देखील उल्लेख केला आहे. अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराचा अभिषेक 22 जानेवारीला होणार आहे.

Related posts