Nokia G42 5G Launched In India With Snapdragon 480+ SoC Check Price Specifications And More

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : नोकिया (Nokia) कंपनीने नुकताच भारतात स्वस्त 5G फोन (Cheap 5G phones in India) लाँच केला आहे. नोकियाने भारतीय बाजार दमदार फिचर्ससह दमदार  नोकिया जी42 फायजी (Nokia G42 5G) फोन आणला आहे. 15 सप्टेंबरपासून या फोनची ऑनलाईन विक्री सुरु होईल. अ‍ॅमझॉन (Amazon) वर 15 सप्टेंबर रोजी  दुपारी 12 वाजल्यापासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल.

भारतात स्वस्त 5G फोन लाँच

Nokia G42 5G या स्मार्टफोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध आहे. Nokia G42 5G मध्ये तुम्हाला 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 90Hz डिस्प्ले देण्यात आलेला आहे. Nokia G42 5G हा फोन सिंगल स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच केला आहे. 6GB रॅम आणि 128GB व्हेरियंटची किंमत 12,599 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 11GB पर्यंत रॅमचा पर्याय आहे.

Nokia G42 5G मधील स्पेक्स

Nokia G42 5G हा स्मार्टफोन तीन रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. यामध्ये राखाडी, गुलाबी आणि जांभळा रंग आहेत. मोबाईल फोनमध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.56 इंचाचा IPS LCD डिस्प्ले असेल. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, यामध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा, 2MP सेकेंडरी कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी तुम्हाला गोरिल्ला ग्लास 3 चे देण्यात आहे.

हा स्मार्टफोन Snapdragon 480+ SoC आणि Android 13 सह येतो. Nokia G42 5G मध्ये कंपनी तुम्हाला 2 वर्षांचे OS अपडेट्स आणि तीन वर्षांचे सिक्युरिटी अपडेट देईल. फोनमध्ये 20 वॉट फास्ट चार्जिंगसह 5000 mAh बॅटरी आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : [ad_2]

Related posts