Big Reason Why Indian T 20 Team Was Not Declared By BCCI For West Indies Tour ; BCCI ने भारताचा टी-२० संघ का जाहीर केला नाही

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी भारताचा कसोटी आणि वनडे संघ जाहीर करण्यात आला आहे. पण यावेळी भारत वेस्ट इंडिजमध्ये टी-२० सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. पण बीसीसीआयने यावेळी भारताचा टी-२० संघ जाहीर केला नाही. बीसीसीआयने यावेळी भारताचा टी-२० संघ काही जाहीर केला नाही, याचे मोठा कारणही आता समोर आले आहे.भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-२० सामने खेळणार आहे. या पाच पैकी दोन टी-२० सामने हे अमेरिकेत खेळवण्यात येणार आहेत. पण बीसीसीआयने आज कसोटी आणि वनडे संघ जाहीर केला, पण त्यांनी टी-२० संघाची घोषणा मात्र केली नाही. बीसीसीआयने नेमके असे का केले, याचे कारणही आता समोर आले आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये भारताच्या टी-२० संघावर लक्ष टाकले तर रोहित शर्मा हा या संघाचा भाग राहीलेला नाही. भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद हे हार्दिक पंड्याकडे देण्यात आले आहे. यापुढेही हार्दिककडेच भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद कायम राहील, असे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे आता भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद रोहितकडे नसेल. पण जर बीसीसीआयने यावेळी जर टी-२० संघ जाहीर केला असला तर WTC Final नंतर रोहितचे कर्णधारपद बीसीसीआयने काढून घेतले अशी चर्चा सुरु झाली असती. सध्याच्या घडीला बीसीसीआयला प्रसारमाध्यमांना मसाला मिळेल, अशी कोणतीही गोष्ट करायची नाही. त्यामुळे त्यांनी ही गोष्ट टाळली, असे समजत आहे. दुसरीकडे संघ निवडण्यासाठी कर्णधार उपलब्ध असावा लागतो आणि निवड समिती त्याच्याबरोबर बसून संघाबाबतचा निर्णय घेत असते. निवड समितीने रोहित शर्माबरोबर चर्चा करून कसोटी आणि वनडेचा संघ जाहीर केला आहे. त्यामुळे टी-२० चा संघ जाहीर करताना त्यांना आता हार्दिकशी चर्चा करावी लागणार आहे. त्यामुळे आतापर्यंत टी-२० संघाची घोषणा करण्यात आली नसल्याचे समजत आहे.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे. पण बीसीसीआयने यावेळी भारताचा टी-२० संघ जाहीर का केला नाही, याचे कारण आता स्पष्ट झाले आहे.

[ad_2]

Related posts