[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Oppo Reno 10 Series Launch Date : अँड्रॉईड स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पो जुलै महिन्यात Oppo 10 series मधील 3 स्मार्टफोन लाँच करणार आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे स्मार्टफोन लाँच होणार आहेत. अशातच ओप्पो भारतात 10 जुलै रोजी ओप्पो रेनो 10 सीरिज (Oppo Reno 10 series) चा स्मार्टफोन लाँच करणार आहे. यामध्ये Oppo Reno 10, Reno 10 Pro आणि Reno 10 Pro Plus या तीन स्मार्टफोनचा समावेश आहे. कंपनीने हा स्मार्टफोन विक्रीसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध केला आहे. नुकतंच या स्मार्टफोनच्या किंमतीविषयी माहिती लीक झाल्याचं समोर आलं आहे. या लीक माहितीनुसार, कंपनी Oppo Reno 10 सीरिज 30 हजार रुपये किंमतीत लाँच करण्याची शक्यता आहे. ही किंमत 50 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. यामुळे या सीरिजमधील टॉप मॉडलची किंमत 45 ते 50 हजार रुपये असू शकते. कंपनी या फोनमध्ये भन्नाट फीचर उपलब्ध करुन देणार आहे. या स्मार्टफोनविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया…
Oppo Reno 10 सीरिज आणि स्पेसिफिकेशन्स
ओप्पो ही चिनी स्मार्टफोन कंपनी आहे. यापूर्वीच कंपनीने चीनमध्ये Oppo Reno 10 सीरिज स्मार्टफोन लाँच केला आहे. यामुळे स्मार्टफोनशी संबंधित बरेच स्पेसिफिकेशन्स उघड झाले आहेत. अर्थात, कंपनीकडून भारतात लाँच करताना स्मार्टफोनमध्ये बदल केला जाऊ शकतो.
Oppo Reno 10 Series मध्ये FHD+ रिझॉल्यूशनसह 6.7 इंच अमोलेड डिस्प्ले मिळणार आहे.
Oppo Reno 10 Series मध्ये डिस्प्लेसाठी 120hz चा रिफ्रेश रेट सपोर्टेड आहे.
Oppo Reno 10 Series मध्ये ट्रिपल सेटअप कॅमेरा मिळणार आहे. यामध्ये 64+32+8MP असा कॅमेरा सेटअप पाहायला मिळू शकतो. या स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सेलचा असेल.
Oppo Reno 10 Series चा स्मार्टफोन Snapdragon 778G SoC (A system-on-a-chip) या प्रोसेसरवर चालणार आहे.
Oppo Reno 10 Series मध्ये 4,600 mAh इतक्या क्षमतेची बॅटरी आहे.
Oppo Reno 10 Series मध्ये 80 वॅटचा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे.
या सीरिजमधील टॉप मॉडल Oppo Reno 10 Pro Plus च्या स्मार्टफोनमध्ये 50MP + 64MP + 8MP असा ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. प्रो मॉडेल फोन MediaTek Dimensity 8200 SOC या प्रोसेसरसाठी सपोर्टेड आहे. तर प्रो प्लस मॉडेलमध्ये Snapdragon 8+ Gen 1 SoC या प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. ओप्पोच्या Reno 10 सीरिज मॉडेलमध्ये 4,600mAh इतकी बॅटरी क्षमता आहे. तर Reno 10 प्रो प्लस मॉडेलमध्ये 4,700mAh इतकी बॅटरी क्षमता उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 100 वॅटच्या फास्ट चार्जिंगसाठी सपोर्टेड आहेत.
11 जुलै रोजी नथिंगचा स्मार्टफोन होणार लाँच
10 जुलै रोजी ओप्पोचे Oppo Reno 10 Series चे मॉडेल लाँच होतील. यानंतर 11 जुलै रोजी भारतात Nothing Phone 2 लाँच करण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन सांयकाळी 8:30 वाजता लाँच करण्यात येणार आहे. यानंतर हा स्मार्टफोन रात्री 9 वाजल्यानंतर फ्लिपकार्टवरुन विकत घेता येईल. सध्या या फोनची प्री बुकिंग सुरु करण्यात आली आहे. यासाठी 2,000 रुपये इतकी रक्कम भरावी लागेल. यानंतर तुम्हाला फोनची प्री बुकिंग करता येणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा :
Oppo Reno 7 सीरिजमधला स्वस्त स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लाँच, जाणून घ्या याचे फीचर्स
[ad_2]