[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
लग्नानंतरच्या रात्री नवरीच्या पोटात दुखू लागलं. सासरच्या लोकांनी तिला रुग्णालयात नेलं. तरुणी गर्भवती असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर तिचा पती आणि सासरच्या मंडळींच्या पायाखालची जमीनच सरकली. नवविवाहित तरुणी सात महिन्यांची गर्भवती होती. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवरीनं मुलीला जन्म दिला.
जोडप्याचा विवाह २६ जूनला झाला. लग्नाच्या पहिल्या रात्री नवरीनं पोटदुखीची तक्रार केली. तिच्या वेदना वाढू लागल्या. तिला कुटुंबियांनी रुग्णालयात नेलं. तेव्हा ती सात महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. ते ऐकून नवविवाहित पती आणि त्याच्या कुटुंबाला धक्काच बसला. नवरीच्या गर्भारपणाची आपल्याला कोणतीच कल्पना नसल्याचं नवरदेवानं सांगितलं.
नवरीच्या कुटुंबाला तिच्या गर्भवती असण्याची कल्पना होती. मात्र त्यांनी आपल्याला अंधारात ठेवलं असल्याचा आरोप तरुणाच्या कुटुंबियांनी केला. ‘तरुणीला किडनी स्टोनचा त्रास होता. किडनी स्टोन काढण्यासाठी तिनं शस्त्रक्रिया केली. त्यानंतर तिचं पोट फुगलं, असं तरुणीच्या कुटुंबियांनी सांगितलं होतं. त्यांनी आमची फसवणूक केली,’ असा दावा तरुणाच्या कुटुंबियांनी केला.
नवरदेवाच्या कुटुंबियांनी महिलेला आणि तिच्या बाळाचा स्वीकार करण्यास नकार दिला. त्यांनी तिच्या प्रसुतीची माहिती कुटुंबाला कळवली. यानंतर नवरीचं कुटुंब ग्रेटर नोएडा आलं. त्यांनी तरुणी आणि तिच्या बाळाला स्वत:सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबांनी या प्रकरणी तक्रार न करण्याचा निर्णय घेतला.
[ad_2]