[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
असिफाबाद मंडळातील बाबापूर गावातील दहावीत शिकणारा सचिन १८ मे रोजी वाढदिवस (Birthday) साजरा करण्यासाठी आसिफाबाद शहरात खरेदीसाठी गेला होता. बाजारात त्याला छातीत दुखू लागले आणि तो जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला तात्काळ स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना मंचेरियल शासकीय रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला.
सचिनचा मृतदेह गावातील त्याच्या घरी आणण्यात आला. कुटुंब दु:खी होते, मात्र मुलाच्या मृतदेहाजवळ वाढदिवसाचा केक कापण्यात आला. यावेळी पालकांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. हा केक त्यांनी मुलाच्या मृतदेहाजवळ ठेवला आणि मृतदेहाला मिठी मारून ते आक्रोश करु लागले. वडील गुणवंतराव आणि आई ललिता यांचा आक्रोश पाहून तेथे उपस्थित सर्वांच्या डोळ्यात पाणी तरळलं.
केक कापताना मुलांनी सचिनसाठी वाढदिवसाचं गाणंही गायलं, तर स्थानिक ग्रामस्थांनी त्याच्या स्मरणार्थ मेणबत्त्या पेटवल्या. मित्रांनी सचिनच्या फोटोसोबत वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा एक मोठा फ्लेक्सी लावला. सचिन आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्सुक होता. त्याला वाढदिवस थाटामाटात साजरा करायचा होता. मात्र, त्याच दिवशी तो हे जग सोडून गेला. त्यामुळे कुटुंबासह अख्ख्या गावावर शोककळा पसरली आहे. सचिनच्या अंत्यसंस्कारात संपूर्ण बाबापूर गाव सहभागी झाले होते.
[ad_2]