Akash Madhwal Can Become Team India New Yorker King Better Replacement Of Jasprit Bumrah 2023 Ipl Live Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL Given Better Replacement of Jasprit Bumrah : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये अनेक युवा खेळाडूंनी आपली छाप सोडली आहे. रिंकू सिंह (Rinku Singh), यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal), प्रभसिमरन सिंह (Prabhsimran Singh), नेहाल वढेरा (Nehal Wadhera), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांच्यासह अनेक खेळाडू भारतीय क्रिकेट संघाचं भविष्य ठरू शकतात. यंदाच्या आयपीएल हंगामात युवा फलंदाजांसोबतच अनेक गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली आहे. आयपीएल 2023 मध्ये टीम इंडियाला (Team India) नवा यार्कर किंग (New Yorker King) मिळाल्याचं दिसून येत आहे.  सध्या जसप्रीत बुमराह हा टीम इंडियाचा यार्कर किंग आहे, पण बुमराह सध्या दुखापतीमुळे त्रस्त असून नेहमीच संघाबाहेर असतो. पण मुंबई इंडियन्सचा युवा स्टार खेळाडू आगामी काळात टीम इंडियामध्ये जसप्रीत बुमराहची जागा घेऊ शकतो. आयपीएलमधील हा गोलंदाज आगामी काळात टीम इंडियाचा न्यू यॉर्कर किंग बनू शकतो.

धोकादायक यॉर्करला तोड नाही

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघातील युवा गोलंदाज आकाश मधवालने (Akash Madhwal) यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. आकाश मधवालने यापूर्वी गुजरात टायटन्सविरुद्ध यॉर्कर चेंडूवर शुभमन गिलला क्लीन बोल्ड करून सर्वांना चकित केलं होतं. यानंतर सनरायझर्सविरुद्धच्या सामन्यात आकाशने आधी फॉर्मात असलेल्या हेनरिक क्लासेनला बाद केलं. त्यानंतर इंग्लंडचा हॅरी ब्रूक क्रीजवर आला आणि पण तोही पहिल्याच चेंडूवर धोकादायक यॉर्कर चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. आकाश मधवालची धोकादायक गोलंदाजी पाहता आगामी काळात टीम इंडियाला नवा यॉर्कर किंग मिळू शकतो, असं म्हणता येईल. मुंबई इंडियन्सला या मोसमात बुमराहची उणीव भासत होती पण गेल्या सहा सामन्यांमध्ये आकाश मधवालने चमकदार कामगिरी करत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

हैदराबादच्या सामन्यात घेतले चार बळी

आकाश मधवालने आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत मिळालेल्या सर्व संधींमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याने शानदार गोलंदाजी करत आपले यॉर्कर कौशल्य पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. पहिल्याच चेंडूवर त्याने हॅरी ब्रूकला क्लीन बोल्ड केलं. सनरायझर्सविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात त्याने चार षटकांत 37 धावा देत चार बळी घेतले. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाची धावसंख्या 220-230 पर्यंत जाईल असं वाटत होतं. पण डेथ ओव्हर्समध्ये आकाश मधवालच्या शानदार गोलंदाजीमुळे हैदराबादला 200 धावांपर्यंतच मजल मारता आली.

आकाश मधवालची आयपीएल 2023 मधील कामगिरी 

आकाश मधवालच्या यंदाच्या मोसमात शानदार कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधलं. त्याने मुंबई इंडियन्स संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी केली. आकाश मधवालने आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून आतापर्यंत सहा सामने खेळले असून यामध्ये त्याने आठ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेटही 9 च्या आत आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 4 षटकात त्याने 37 धावा देऊन चार विकेट्स घेतल्या. मुंबई संघासाठी अशी कामगिरी करणारा तो दुसरा अनकॅप्ड गोलंदाज ठरला. त्याच्या आधी राहुल चहरने 2021 मध्ये 27 धावा देत 4 बळी घेतले होते. त्याचा हा पहिलाच आयपीएल हंगाम आहे. गुजरात टायटन्सविरुद्धही त्याने 31 धावा देत तीन बळी घेतले.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

[ad_2]

Related posts