[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Election Commission Of India : बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग आणखी एक नवीन तंत्र अवलंबणार आहे. मतदानादरम्यान बोटावर शाईऐवजी आता लेझर चिन्हाचा वापर केला जाणार आहे. हे तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’ वर आधारित राहणार आहे. तसेच ईव्हीएम मशीमध्ये एक कॅमेरा देखील असणार आहे. जो मतदान करताना मतदारांचे फोटो काढणार आहे.
बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगकडून अनेक नवे प्रयोग करण्यात आले आहे. यावर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ही नवी प्रणाली लागू केली जाऊ शकते. त्याच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. लेझर तंत्रज्ञानामुळे हेराफेरी थांबेल. अनेक दिवस लेझरने बनविलेले चिन्ह काढणे जवळपास अशक्य असल्याचा दावा केला जात आहे. एवढेच नाही तर ईव्हीएममध्ये कॅमेराही बसविण्यात येणार आहे, जो मतदाराचा फोटो टिपेल. या यंत्रणेचा वापर झाल्यास शाईचा वापर कालबाह्य होऊ शकतो.
आगामी लोकसभा निवडणुकीत तंत्र अवलंबण्याची शक्यता
या वर्षी मिझोरम, छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा या राज्याच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर लगेचच लोकसभा निवडणुका होणाप आहे. जर विधानसभा निवडणुकीत हा प्रयोग यशस्वी झाला तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ही प्रणाली लागू करण्यात येईल. या नव्या प्रणालीमुळे बोगस मतदान, दुबार मतदानाला आळा बसेल. तसेच लेझर तंत्रज्ञानामुळे मतदान प्रक्रियेतील घोटाळे थांबतील. कारण नखांवर लेझरची खूण केल्याने पुन्हा मतदानास आल्यास व्यक्ती पकडला जाईल. ईव्हीएममधील कॅमेरा दुसऱ्यांदा येणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवून त्याबद्दलचा अलर्ट अधिकाऱ्यास पाठवेल. त्यामुळे बोगस मतदानाला आळा बसेल.
डाव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्याची पद्धत
मतदानाची खूण म्हणून डाव्या हाताच्या तर्जनीला (पहिले बोट) शाई लावण्याची पद्धत आहे. मतदान बुथवर तुमची ओळख पटवून तुम्हाला प्रवेश मिळतो. ईव्हीएमवर बटन दाबून प्रत्यक्ष मतदान करण्यापूर्वीच पुसली न जाणारी शाई तुमच्या डाव्या तर्जनीला लावली जाते. त्यानंतर स्वाक्षरी किंवा अंगठ्याचं निशाण तुमच्या नावासमोर घेतलं जातं. त्यानंतर तुम्हाला मतदान करता येतं. ही शाई तुमच्या बोटावर पुढचे काही दिवस टिकून राहते. मतदान करण्यापूर्वी पोलिंग ऑफिसर तुमच्या डाव्या तर्जनीवर शाई तर लावलेली नाही ना, हे तपासून बघतो. जर शाई असेल, तर याचा अर्थ मतदाराने आधीच मतदान केलं आहे. साहजिकच ती व्यक्ती पुन्हा मतदानासाठी अपात्र ठरते.
Reels
हे ही वाचा :
काय सांगता! एक लाख मतदारांचे चेहरे एकसारखेच, निवडणूक विभागाकडून पडताळणी सुरु
[ad_2]