18 Year Old Girl Bought A Restaurant Where She Washed Dishes Once; जिथे कधी भांडी घासली, आज त्याच रेस्टॉरंटची मालकीण झाली; १८ वर्षीय तरुणीची थक्क करणारी कहाणी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ओहायो: एक १८ वर्षांची मुलगी कधीकाळी ज्या रेस्टॉरंटमध्ये भांडी घासायची आज त्याच रेस्टॉरंटची मालकीण झालीये. पॉट वॉशर, कुक इत्यादी काम केल्यानंतर ती आता एक तरुण उद्योजक झाली आहे. एका मुलाखतीत त्याने आपली ही यशोगाथा सांगितली आहे. बचत आणि गुंतवणुकीबद्दलही तिने सांगितले आहे.सीएनबीसी न्यूजशी बोलताना अमेरिकेतील ओहायो येथे राहणाऱ्या सामंथा फ्रायने सांगितले की, तिच्या मनात सुरुवातीपासूनच व्यवसायाची कल्पना होती. वयाच्या १६ व्या वर्षी तिने हायस्कूल पूर्ण केले. मग, कॉलेजमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला. यादरम्यान, ती कॉलेजचा निधी आणि पॉकेटमनी बचत म्हणून जमा करत होती.

कोवळ्या वयातील प्रेम! ७ वीच्या विद्यार्थ्याचं ८ वीतील मुलीशी अफेअर, नको ते करुन बसले, रुग्णालयात जाताच धक्का
याच दरम्यान, हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तिला एका रेस्टॉरंटमध्ये भांडी धुण्याचं काम मिळालं. काही दिवस हे काम केल्यानंतर सामंथा कुक बनली. कॉलेजचा फंड आणि रेस्टॉरंटमध्ये मिळणारा पगार यातून कुठेतरी गुंतवण्याची योजना तिने आखली. तेव्हा तिला कळाले की रेस्टॉरंटच्या मालकाला हे रेस्टॉरंट विकायचे आहे. रेस्टॉरंट खरेदी करणे आणि त्यात गुंतवणूक करणे ही कल्पना सामंथाला पटली.

जेव्हा सामंथाला कळले की रेस्टॉरंटच्या मालकाला ते विकायचे आहे आणि तो ब्रोकर्सशी बोलत आहे. तेव्हा तिला वाटले की हे रेस्टॉरंट तिनेच का खरेदी करु नये. पण, त्यावेळी तिच्याकडे एक रेस्टॉरंट विकत घेण्याइतके पैसे नव्हते. अनेक दिवसांपासून ती पॉकेटमनी आणि कॉलेज फंडासाठी पैसे जमा करत होती. त्यातून तिच्याकडे काही रक्कम जमा झाली. यासोबतच वयाच्या १६ व्या वर्षापासून ती एका रेस्टॉरंटमध्ये पार्ट टाईम जॉब करत होती, त्यामुळे तिच्याकडे तिथल्या पगाराचेही पैसे होते. या पैशातून तिने एप्रिलमध्ये रेस्टॉरंट खरेदी करण्यासाठी मालकाला डाऊन पेमेंट केले आणि हे रेस्टॉरंट खरेदी केलं.

ना राहायला घर, ना खायला पैसे; डोळे बंद करुन एक निर्णय घेतला अन् झाली ४१ कोटींची मालकीण
आता सामंथा रेस्टॉरंटची मालक बनली आहे. तेही वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी. सध्या हे सर्व माझ्यासाठी नवीन आहे, असं सामंथा सांगते. ती आठवड्यातील ५ दिवस रेस्टॉरंटमध्ये राहते आणि उर्वरित २ दिवस कॉलेजसाठी काम करते. रेस्टॉरंटमधून तिची चांगली कमाई होत आहे. मात्र, तिने अद्याप तिच्या कमाईबाबत खुलासा केलेला नाही.

[ad_2]

Related posts