Ipl 2023 Mi Entered In Playoff Gujarat Titans Win By 6 Wickets-against Rcb Ipl 2023 Live Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mumbai Indians Qualified for Playoffs : आयपीएल 2023 (IPL 2023) मधील शेवटचे डबल हेडर सामने रोमांचक ठरले. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सनरायजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) पराभव केला. त्यानंतरच्या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) कडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (Royal Challengers Bangalore) पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे मुंबई इंडियन्स संघाला प्लेऑफचं तिकीट मिळालं आहे. पराभवासह आरसीबी संघाचं आयपीएल 2023 मधील आव्हान संपुष्टात आलं आहे. यामुळे चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. 

आरसीबीच्या चाहत्यांची निराशा! गुजरातच्या विजयासह मुंबई प्लेऑफमध्ये दाखल

आयपीएल चॅम्पियन बनण्याचं आरसीबी संघाच्या स्वप्नावर पुन्हा एकदा पाणी फिरलं आहे. आयपीएल 2023 च्या प्लेऑफसाठी गुजरात, चेन्नई, लखनौ आणि मुंबई संघ पात्र ठरले आहेत. आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात 20 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चेन्नई संघाकडे 17 गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर लखनौ आणि चौथ्या क्रमांकावर मुंबई संघ आहे. लखनौ संघाकडे 17 तर मुंबई संघाकडे 16 गुण आहेत. आता प्लेऑफमध्ये गुजरात विरुद्ध चेन्नई आणि दुसऱ्या सामन्यात लखनौ विरुद्ध मुंबई लढत पाहायला मिळणार आहे.

गुजरातकडून आरसीबीचा 6 गडी राखून पराभव

गुजरात टायटन्स-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रोमांचक सामना पाहायला मिळाला. गुजरात संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाक फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वात बंगळुरु संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून गुजरात संघाला 197 धावांचं आव्हान दिलं. त्यामुळे गुजरात टायटन्ससमोर सामना जिंकण्यासाठी 198 धावांचं लक्ष्य होतं. गुजरात टायटन्स संघाने 19.1 षटकात 4 विकेट गमावत 198 धावा करत बंगळुरु विरोधातील सामना जिंकला.

कोहलीची शतकी खेळी व्यर्थ, गिलचं शतक ठरलं वरचढ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून विराट कोहलीने शानदार शतक झळकावलं. विराट कोहलीने 61 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 13 चौकार आणि 1 षटकार लगावला. पण कोहलीची शतकी खेळी व्यर्थ ठरली. गुजरात टायटन्सकडून सलामीवीर शुभमन गिलने शानदार शतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला. शुभमन गिलने 52 चेंडूत नाबाद 104 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 8 षटकार मारले. शुभमन गिलशिवाय विजय शंकरने 35 चेंडूत 53 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने या खेळीत 7 चौकार आणि 2 षटकार ठोकले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक दोन गडी बाद केले. तर विजयकुमार वैशाक आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी एक-एक गडी बाद करण्यात यश मिळालं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

[ad_2]

Related posts