Travel : ‘या’ समुद्रात कोणीही बुडत नाही; पोहता येत नसणारेही इथं हमखास भेट देतात, महिलांसाठी तर असते ब्युटी ट्रीटमेंट

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Dead Sea Secrets : पृथ्वीवर अशी कैक ठिकाणं आहेत, जी आपल्या कल्पनाशक्तीला आणि वास्तवालाही शह देतात. काही ठिकाणांची भौगोलिक रचना आपल्याला भारावून सोडते, तर काही ठिकाणांची कधीही न उलगडलेली रहस्य आपल्या कुतूहलात आणखी भर टाकण्याचं काम करतात. सध्या अनेकांच्या वाट्याला आलेली आर्थिक सुबत्ता, नोकरीच्या विविध संधी या आणि अशा अनेक कारणांनी या भारावणाऱ्या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळते. यातलीच एक जागा अशीही आहे, जी पाहताक्षणी जितकं प्रसन्न वाटतं तितकाच तिथं पाय ठेवला असता आपण बुडणार तर नाही ही भीती सुद्धा मनात घर करते. 

घाबरण्याचं कारण नाही, कारण इथं कोणीही कितीही आटापिटा केला तरी मनुष्यच काय, पण इतर कोणतीही गोष्ट बुडू शकत नाही. हे ठिकाण म्हणजे मृत समुद्र. इस्रायलच्या जॉर्डन येथे असणारा हा मृत समुद्र जगातील अनेक वैज्ञानिकांसाठी आश्चर्याचा विषय ठरला आहे. पण, जर का इथं कोणीही बुडत नाही, तर याचं नाव मृत सागर का? तुम्हालाही पडला ना हा प्रश्न? 

एकिकडे इस्रायल आणि दुसरीकडे जॉर्डनच्या सुरेख पर्वतरांगा आणि वेस्ट बँकनं वेढलेल्या या समुद्राला पाहताना निसर्गाचा आविष्कार नेमका कसा असतो याचीच प्रचिती येते. जगातील सर्वात नीच्चांकी बिंदुवर असणारा हा समुद्र पृष्ठापाहून साधारण 440 मीटर खालच्या बाजूस आहे, हाच भाहग पृथ्वीचा सर्वात खालचा भाग म्हणून गणला जातो. 

समुद्राच्या पाण्यामध्ये मीठाचं प्रमाण असतं, पण या समुद्रामध्ये हे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळं त्या पाण्यात कोणताही जीव अथवा वनस्पती तग धरु शकत नाही. या समुद्राच्या आजुबाजूलाही पशु-पक्षी, मासे, रोपं असं काहीच आढळत नाही. 35 टक्के मीठानं व्यापलेल्य़ा या समुद्राचं पाणी इतर समुद्रांच्या तुलनेत 10 पटींनी अधिक खारं असल्यामुळं त्याला मृत समुद्र असं म्हटलं जातं. 

सौंदर्यात भर… 

इस्रायलमधील या मृत सागरात अनेकजण डुंबतात, तरंगतात आणि इथं सौंदर्यात भरही टाकतात. याच मृत सागराच्या पाण्यापासून बनवण्यात आलेली अनेक सौंदर्य प्रसाधनं महागड्या दरांमध्ये जगभरात विकली जातात. मृत सागरातील ओल्या मातीचा संदर्भ क्लिओपात्राच्या सौंदर्यामागं दडलेल्या रहस्याशीसुद्धा जोडला जातो. मागील काही वर्षांमध्ये या समुद्राला आणि नजीकच्या भागाला हेल्थ रिसॉर्ट म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं आहे. 

Related posts