[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Virat Kohli, Asia Cup 2023 : आशिया चषक 2023 पूर्वी रनमशीन विराट कोहली रंगात आला आहे. आशिया चषकापूर्वी विराट कोहली जोरदार तयारी करताना दिसत आहे. विराट कोहली जिममध्ये जोरदार व्यायाम करताना दिसत आहे. विराट कोहली जिममध्ये ट्रेनिंग करतानाचा व्हिडीओ समोर आलाय. जिममध्ये विराट कोहली च्चक घामाने आंघोळ करताना दिसतोय. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यामध्ये तो ट्रेडमिलवर धावताना दिसत आहे. कोहली वेस्ट इंडिज दौऱ्यावर कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत दिसला होता. आता कोहली आशिया चषक 2023 च्या माध्यमातून थेट मैदानात उतरणार आहे. त्यापूर्वी तो जोरदार तयारी करत आहे. व्हिडिओमध्ये कोहली शर्टलेस दिसत आहे. कोहलीचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरलाय. काही वेळापूर्वी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओला 50 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना कोहलीने लिहिले की, Chutti hai fir bhi bhaagna toh padega
पाहा व्हिडीओ….
Chutti hai fir bhi bhaagna toh padega 😁🏃 pic.twitter.com/BwNVLDs2O9
— Virat Kohli (@imVkohli) August 15, 2023
30 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरोधात होत आहे. यंदाचा आशिया चषक सहा संघामध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 13 सामने होणार आहेत. त्यापैकी 9 सामने श्रीलंका तर चार पाकिस्तानमध्ये होणार आहेत. भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकामध्ये होणार आहेत. 30 ऑगस्ट रोजी पाकिस्तान आणि नेपाळ यांच्या सामन्याने आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. आशिया चषक स्पर्धेत 6 संघ सहभागी होणार असून त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान आणि नेपाळ हे संघ गट-अ मध्ये आहेत. तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानला ब गटात ठेवण्यात आले आहे. यावेळी ही स्पर्धा एकदिवसीय स्वरूपात खेळवली जाईल. याआधी 2022 मध्ये ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळली गेली होती, ज्यामध्ये अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून श्रीलंकेने विजेतेपद पटकावले होते.
कुठे पाहाता येणार सामने?
31 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकामध्ये आशिया चषक रंगणार आहे. भारतीय चाहत्यांसाठी आशिया चषकाचे लाईव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टारवर पाहाता येईल. त्याशिवाय स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह सामने पाहाता येणार आहेत. त्याशिवाय एबीपी माझ्याच्या संकेतस्थळावरही आशिया चषकासंदर्भातील अपडेट तुम्हाला पाहाता येतील. आशिया चषकासाठी हायब्रिड मॉडेल वापरण्यात आलेय. पाकिस्तानमध्ये चार सामने होणार आहेत. तर उर्वरित सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. हायब्रिड मॉडेलचा स्विकार केल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये जाणार नाही? हे स्पष्ट झालेय. टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. बुधवारी आशिया चषक वेळापत्रकाची घोषणा होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरारक सामना श्रीलंकामध्ये होणार आहे.
[ad_2]