Dhule Latest News An Electric Bike Made By Bhushan Kadam Of Rickshaw Driver Son In Dhule District Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

धुळे : धुळे जिल्ह्यातील (Dhule) शिंदखेडा तालुक्यातील गोराणे या एका छोट्याशा खेडेगावातील रिक्षा चालकाच्या मुलांनी आपली कल्पकता वापरून विविध प्रकारचे आकर्षक फीचर्स असणारी इलेक्ट्रिक बाइक तयार केली आहे. भूषण कदम (Bhushan Kadam) असे या तरुणाचं नाव असून मुंबई विद्यापीठातून (Mumbai University) त्याने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र परदेशात नोकरीची संधी उपलब्ध असतानाही त्याने भारतातच राहून देशासाठी काहीतरी इनोव्हेशन करायचे ठरवले असून सध्या त्याची ही गाडी गावात आणि पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरली आहे. 

इंधनाचे वाढते दर आणि दुसरीकडे इंधनाची (Petrol) बसणारी टंचाई या बाबी डोळ्यांसमोर ठेवून विविध कंपन्यांनी विजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक बाइक (E Bike) बनवण्यावर सध्या भर दिला आहे. विशेष म्हणजे जनतेचाही या गाड्यांना प्रतिसाद मिळू लागला असून मोठ्या शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच क्रेझ वाढली आहे. या गाड्यांचा प्रयोग देशात यशस्वी झाला असला तरी त्या गाड्यांमध्ये निर्माण होणाऱ्या इतर काही समस्यांमुळे या इलेक्ट्रिक बाइकचे मार्केट अद्यापही मर्यादित स्वरूपातच दिसून येत आहे. अशा परिस्थितीत यात काही बदल करून सर्वसामान्यांना अधिक फायदेशीर ठरणारी इलेक्ट्रिक बाइक बनवता येईल का? या विचारातून धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा (Shindkheda) तालुक्यातील गोराणे येथील रहिवासी असणाऱ्या भूषण कदम याने त्याच्या कॉलेजच्या अखेरच्या वर्षातील प्रोजेक्ट रिसर्चसाठी इलेक्ट्रिक व्हेईकल हा विषय निवडला होता. 

इलेक्ट्रिक व्हेईकलवर (E Vehicle) रिसर्च करत असताना त्याच्या लक्षात असे आले की इलेक्ट्रिक गाड्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या बॅटरी हिटिंग मोठ्या प्रमाणावर तयार होत असते. ही हीटिंग कमी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची विशेष व्यवस्था नसल्यामुळे बॅटरीचे तापमान वाढून गाड्या पेट घेतात. तसेच इलेक्ट्रिक गाडीतील सर्व कंपोनंटपैकी सर्वात महाग असणाऱ्या बॅटरीची क्षमता आणि आयुष्य देखील कमी होत असते. ही समस्या दूर करण्यासाठी भूषणने स्वतःची हिट मॅनेजमेंट सिस्टीम तयार केली. यामुळे गाडीच्या बॅटरीचे तापमान नियंत्रणात राहून ती चालकासाठी आणखी सुरक्षित बनली आहे. सध्या उपलब्ध असणाऱ्या इलेक्ट्रिक बाइकचे बॅटरीचे आयुष्य दोन ते तीन वर्ष मानले जाते. 

ई बाईकला वेगवगेळे फीचर्स 

भूषणने तयार केलेल्या हिट मॅनेजमेंट सिस्टीममुळे बॅटरीचे आयुष्य आठ ते दहा वर्षांपर्यंत जाऊ शकते, असा दावा त्याने केला आहे. इलेक्ट्रिक बाइक चार्जिंगला सध्या सहा ते सात तासांचा वेळ लागतो. परंतु त्याने तयार केलेल्या सिस्टीममुळे बॅटरी गरम होत नसल्याने फास्ट चार्जिंग करणे शक्य होते. त्यामुळे बॅटरी चार्ज करायला फक्त तीस ते पस्तीस मिनिटे लागतात, एकदा पूर्ण क्षमतेने चार्ज झालेली बॅटरी 160 ते 180 किलोमीटर पर्यंत चालू शकते, असा दावा भूषणने केला आहे. तसेच व्हॉइस कमांड, फिंगर प्रिंट, लॉक गुगल नेव्हिगेशन ऑल टाइम लोकेशन ट्रेकिंग सिस्टीम’ यासारखे आणखी इतर काही स्मार्ट फीचर्स भूषणने आपल्या इलेक्ट्रिक बाइकमध्ये दिल्या आहेत. 

पंचक्रोशीत चांगलाच चर्चेचा विषय 

भूषणचे वडील नंदू पाटील हे भूमीहीन असून ते रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात तर भूषणची आई वंदना पाटील या शेतमजुरी करून कुटुंबाला हातभार लावतात. कुटुंबाच्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्याने जिद्दीच्या जोरावर आपले शिक्षण पूर्ण केले असून या इलेक्ट्रिक बाइकचे नवीन संशोधन देखील केले आहे. त्याने तयार केलेली गाडी गावासह पंचक्रोशीत सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत असून ही गाडी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी होत आहे. आपण बाजारात ही गाडी आणण्यासाठी प्रयत्नशील असून लवकरच याचे मास प्रोडक्शन सुरू करणार असल्याचे देखील भूषणने सांगितले आहे. 

इतर महत्वाची बातमी : 

[ad_2]

Related posts