Rahul Dravid Confirms KL Rahul Wont Be Available For First 2 Games Asia Cup 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

KL Rahul : केएल राहुल दुखापतीमुळे आशिया चषकाच्या पहिल्या दोन सामन्यांना मुकणार आहे. केएल राहुल पाकिस्तान आणि नेपाळ यांच्याविरोधातील सामन्यासाठी उपलब्ध नाही. भारतीय संघाचे मुख्य कोच राहुल द्रविड याने मंगळवारी याबाबतची माहिती दिली. राहुल द्रविड म्हणाला की, केएल राहुल हा वेगाने बरा होत आहे, पण तो आशिया चषक 2023 स्पर्धेतील भारताच्या पहिल्या दोन सामन्यासाठी उपलब्ध नसेल. केएल राहुल मांडीच्या दुखापतीमुळे गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे. दरम्यान, मांडीच्या दुखापतीमुळे राहुल गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर होता. मांडीच्या दुखापतीवर मात केल्यानंतर त्याला आणखी दुसरी दुखापत झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि नेपाळ यांच्याविरोधातील सामन्यासाठी तो उपलब्ध नसेल.

कोच राहुल याने आशिया चषकाआधी श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी पीटीआयला मुलाखत दिली. त्यामध्ये केएल राहुल पहिल्या दोन सामन्याला उफलब्ध नसेल, असे सांगितले. राहुल द्रविड म्हणाला की,  केएल राहुल याने आठवडाभर आमच्यासोबत चांगला सराव केला.  तो चांगला खेळत आहे, त्याच्यामध्ये  चांगली प्रगती दिसत आहे. मात्र तो आशिया चषकातील भारताच्या पहिल्या दोन्ही सामन्यासाठी अनुपलब्ध असेल. केएल राहुल बेंगलोर येथे एनसीएमध्ये थांबणार आहे. तो भारतीय संघासोबत श्रीलंकेला रवाना होणार नाही. चार सप्टेंबर रोजी राहुल स्पर्धेसाठी उपलब्ध आहे की नाही, याचा निर्णय घेतला जाईल. 

आम्ही आशिया चषकासाठी श्रीलंकेला रवाना होऊ, तेव्हा राहुल एनसीएमध्ये थांबेल. पुढील काही दिवस तो एनसीएमध्ये फिटनेसवर काम करेन. चार सप्टेंबर रोजी राहुलच्या दुखापतीबाबत निर्णय घेतला जाईल. केएल राहुल पहिल्या दोन सामन्यासाठी उपलब्ध नाही, असे कोच राहुल द्रविडने सांगितले.  

आशिया चषक कधीपासून ?

आशिया चषकाला अवघे काही दिवस शिल्लक आहे. 30 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील सामन्याने आशिया चषकाचा शुभारंभ होईल. यंदाचा आशिया चषक वनडे फॉर्मेटमध्ये हायब्रिड मॉडेलनुसार होणार आहे. भारताचे सर्व सामने श्रीलंकामध्ये होणार आहे.  सहा संघामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. अ ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान आणि नेपाळ संघाचा समावेश आहे. तर ब गटामध्ये बांगलादेश, आफगाणिस्तान आणि श्रीलंका संघ असतील. आशिया चषकाचे चार सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. तर 9 सामने श्रीलंकामध्ये होणार आहेत. 13 सामन्यानंतर आशियाचा किंग कोण यावरुन पडदा उठेल. 

आशिया चषकासाठी भारताचा संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (बॅकअप विकेटकिपर)



[ad_2]

Related posts