[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
One Nation One Election Committee: ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या (One Nation One Election Committee) समितीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun kharge)यांचे नाव समाविष्ट करण्यात आले नाही. यावर काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे. खर्गे यांच्याऐवजी काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांच्या नावाचा समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहून या समितीचा भाग होण्यास नकार दिला आहे.
वन नेशन, वन इलेक्शन या समितीचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या समितीचे अध्यक्ष असतील. गृहमंत्री अमित शहा, लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी हे या समितीचे सदस्य असतील. सोबतच गुलाम नबी आझाद, एनके सिंह, सुभाष सी कश्यप, हरीश साळवे आणि संजय कोठारी यांना ‘वन नेशन वन इलेक्शन’ समितीचे सदस्य करण्यात आले आहे. एक देश एक निवडणूक म्हणजे सर्व देशात एकाच वेळी निवडणुका घेणे. म्हणजे एकाच वेळी लोकसभेसोबतच सर्वच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेणे.
मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव न आल्याने काँग्रेस नाराज
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाचा समितीमध्ये समावेश करण्यात आला नाही. त्यामुळं काँग्रेसनं नाराजी व्यक्त केलीय. ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या विषयावरील उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून संसदीय लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न असल्याचे मत काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी व्यक्त केलं. घोटाळे, बेरोजगारी, महागाई आणि इतर मुद्द्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी ही नौटंकी असल्याचे केसी वेणुगोपाल म्हणाले. समितीमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांची नाव सामील न करण्याचे काय कारण आहे? असा सवाल केसी वेणुगोपाल यांनी केला.
अधीर रंजन चौधरी यांचा समितीत सामील न होण्याचा निर्णय
काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी या समितीचा भाग होण्याचे निमंत्रण नाकारले आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहलं आहे. या समितीत काम करण्यास नकार देण्यात मला कोणताही संकोच नाही. मला भीती वाटते की, ही संपूर्ण फसवणूक आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांचेही नाव या समितीमध्ये नाही. हा संसदीय लोकशाही व्यवस्थेचा अपमान असल्याचे चौधरी म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाचा समितीमध्ये समावेश करण्यात आला नाही. त्यामुळं काँग्रेसनं नाराजी व्यक्त केलीय.
महत्त्वाच्या बातम्या:
One Nation, One Election Committee : वन नेशन, वन इलेक्शन कमिटीची अधिसूचना जारी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद असणार समितीचे अध्यक्ष
[ad_2]