[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
प्रयागराज: इच्छा पूर्ण न झाल्याने एका तरुणाने चक्क शिवलिंग चोरल्याचा आरोप आहे. या २७ वर्षीय तरुणावर प्रयागराजपासून ७५ किमी अंतरावर असलेल्या कौशांबी जिल्ह्यातील प्रसिद्ध भैरो बाबा मंदिरातून ‘शिवलिंग’ चोरल्याचा आरोप आहे. लग्न करण्याची इच्छा पूर्ण न झाल्याने नाराज होऊन त्याने हे पाऊल उचललं. श्रावण महिन्यात मंदिरात नियमित विशेष पूजा करूनही त्याची इच्छा अपूर्ण राहिली होती.
शुक्रवारी सकाळी काही भाविक महेवा घाट पोलीस ठाण्यांतर्गत कुम्हियावाहा बाजार येथील मंदिरात पोहोचले असता त्यांना शिवलिंग गायब असल्याचं लक्षात आलं. तेव्हा ही घटना उघडकीस आली. त्यांनी तात्काळ ही बाब मंदिर प्रशासन आणि पोलिसांना कळवली. कुम्हियावाहा गावचे प्रधान ओम प्रकाश यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली.

रविवारी पोलिसांनी कुम्हियावाहातील छोटू नावाच्या तरुणाला अटक करुन एका शेतातून ‘शिवलिंग’ जप्त केले.
महेवा घाट पोलिस स्टेशनचे अधिकारी रजनीकांत यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीचे शिवलिंग “शेतात पानांच्या आणि बांबूच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवलेले आढळून आले. या व्यक्तीवर आयपीसीच्या कलम ३७९ अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याची त्वरित तुरुंगात रवानगी करण्यात आली”.
या तरुणानेही आपल्या या कृत्याची कबुली दिली आहे. कठोर भक्ती करुनही वैवाहिक आनंदाची इच्छा पूर्ण न झाल्याने भगवान शंकराबाबत आपला असंतोष व्यक्त करण्यासाठी त्याने हे पाऊल उचललं. श्रावणात संपूर्ण महिना त्याने देवाला प्रार्थना केली. यावेळी त्याने दोन महिना श्रावण पाळला, ८ सोमवार उपवास केले होते.
[ad_2]