[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Lic lapse Policy : अनेक वेळा असे घडते की आपण विमा पॉलिसीचे प्रीमियम वेळेवर भरु शकत नाही. त्यामुळं अनेकांची पॉलिसी लॅप्स होते. तुमच्याकडेही भारतीय आयुर्विमा निगम (LIC) ची अशी कोणतीही पॉलिसी असेल जी बऱ्याच काळापासून बंद आहे, तर आता तुम्ही ती पुन्हा सुरु करु शकता. एलआयसी पुढील 10 दिवसांसाठी यासाठी 4,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे.
एलआयसीने सध्या लॅप्स पॉलिसीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. त्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर आहे. या मोहिमेअंतर्गत, एलआयसीने ग्राहक केवळ त्यांच्या विमा पॉलिसीचे नूतनीकरण करु शकत नाहीत तर ठेव रकमेवर 4000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात.
लॅप्स पॉलिसी म्हणजे काय?
साधारणपणे LIC ची कोणतीही विमा पॉलिसी किमान 3 वर्षांसाठी वैध असावी. या कालावधीत पॉलिसी पुनरुज्जीवित न केल्यास, ती संपुष्टात येते. यासह, प्रीमियम भरण्याच्या देय तारखेनंतर तुम्हाला प्रत्येक पॉलिसीमध्ये वाढीव कालावधी मिळेल. त्या कालावधीत प्रीमियम भरला नाही तरीही, तुमची पॉलिसी लॅप्स होते. या सर्व पॉलिसींचे थकित प्रीमियम आणि विलंब शुल्क आणि त्यावरील व्याज भरून पुनर्जीवित केले जाऊ शकते. यासाठी एलआयसी वेळोवेळी मोहीमही राबवते.
बंद केलेली पॉलिसी रीस्टार्ट केल्यावर तुम्हाला सूट मिळेल
एलआयसीने लॅप्स झालेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी सुरू केलेल्या विशेष मोहिमेमध्ये विलंब शुल्कावर 30 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रीमियम्सनुसार वेगवेगळ्या सवलती मिळतील. जर तुमचा एकूण थकबाकी प्रीमियम 1 लाख रुपयांपर्यंत असेल, तर तुम्हाला विलंब शुल्कावर 30 टक्क्यांची सूट मिळेल. हे कमाल 3,000 रुपये असेल. जर तुमचा एकूण थकबाकी प्रीमियम रु 1,00,001 ते रु 3,00,000 च्या दरम्यान असेल, तर तुम्हाला कमाल रु. 3,500 पर्यंतच्या विलंब शुल्कावर 30टक्क्यांची सूट मिळेल. तुमच्या पॉलिसीचा एकूण थकित प्रीमियम रु 3,00,001 असल्यास. यावर तुम्हाला कमाल 4,000 रुपयांपर्यंतच्या विलंब शुल्कावर 30 टक्क्यांची सूट मिळेल.
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) नियमांनुसार, जर एखाद्या पॉलिसीधारकाची पॉलिसी प्रीमियम न भरल्यामुळे रद्द झाली असेल, तर त्याची पॉलिसी पुन्हा चालू करण्यासाठी, तुम्हाला थकबाकी प्रीमियमसह काही दंड भरावा लागेल. थकित प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसी पुनर्संचयित केली जाईल. यानंतरच तुम्ही त्याच्याशी संबंधित उर्वरित फायदे घेऊ शकाल. पण आता ही लॅप्स झालेली पॉलिसी पुन्हा सुरु करण्यासाठी LIC ने खास ऑफर आणली आहे. यावर 4000 रुपयांची सूट देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
PM Modi On LIC : LIC ची स्थिती चांगली, पंतप्रधानांचा दावा; पण आकडेवारी काय सांगते?
[ad_2]