[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Bishan Singh Bedi Died: भारताचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बेदींच्या निधनानंतर क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली. बेदी यांनी भारतासाठी 22 सामन्यात कर्णधारपद सांभाळले होते. बेदी यांच्या नेतृत्वात भारताने पाकिस्तानविरोधात मालिका खेळली होती. त्यावेळी पाकिस्तानच्या संघाने बेईमानी केली होती. पाकिस्तान संघाच्या बेईमानीमुळे बेदी संतापले होते. त्यांनी त्यावेळी असे काही केले, की क्रिकेट विश्वात खळबळ माजली होती.
पाकिस्तानविरोधात नेतृत्व करत असताना बिशन सिंग बेदी यांनी घेतलेल्या निर्णायामुळे सर्वजण हैराण झाले होते. बेदींना या निर्णायामुळे अनेकदा टीकेंचा सामना करावा लागला होता. पण बेदींनी आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला नवी दिशा दाखवली.
बिशनसिंग बेदींच्या नेतृत्वात टीम इंडियाने 3 नोव्हेंबर 1978 रोजी पाकिस्तानविरोधात शाहवील येथील जफर अली स्टेडियममध्ये सामना खेळला होता. त्यावेळी पाकिस्तान टीमने बेईमानी केली होती. त्यामुळे भारताचे खेळाडू वैतागले होते. बिशनसिंग बेदी यांनी त्यावेळी भारताच्या फलंदाजांना माघारी बोलवले होते. पंच आणि पाकिस्तान खेळाडू बेईमानी करत होते, ते पाहून सर्व भारतीय खेळाडू वैतागले होते. या सामन्यात पाकिस्तानचे जावेद अख्तर आणि खिजर हयात हे पंच म्हणून काम पाहत होते.
भारतीय संघाला विजयासाठी 14 चेंडूमध्ये 23 धावांची गरज होती. त्यावेळी पाकिस्तानच्या पंचांनी आणि खेळाडूंनी चिडायला सुरुवात केली होती. पाकिस्तानकडून सरफराज नवाज गोलंदाजी करत होता. त्याने चिडायच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. त्याला पंचही मदत करत होते. सरफराजने एका षटकात चार बाऊन्सर टाकले. पण पंचांनी एकाही चेंडू वाईड दिला नाही. काही चेंडू तर फलंदाजाच्या डोक्यावरुनही गेले. पण पंचाकडून काहीही प्रतिक्रिया आली नाही. हे सर्व पाहिल्यानंतर बेदींना राग अनावर आला. भारताकडून अंशुमन गायवाड फलंदाजी करत होता.
अंशुमन गायवाड याला सरफराज नवाज याने लागोपाठ चार बाऊन्सर फेकले होते. पण पंचाने कोणताही निर्णय दिला नाही. या प्रकारावर बिशनसिंग बेदी यांना राग आला. 14 चेंडू शिल्लक राहिले असतानाच बेदी यांनी अंशुमन गायवाड आणि दुसऱ्या फलंदाजाला माघारी बोलवले. बेदी यांनी आपल्या दोन्ही फलंदाजांना माघारी बोलवले आणि पाकिस्तानला विजय दिला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना होता. 40 षटकांच्या सामन्यात पाकिस्तान संघाने सात विकेट्सच्या मोबद्लायत 205 धावा केल्या होत्या. बेदी यांनी पाकिस्तानला विजय दिला. भारताने ही मालिका 2-1 च्या फरकाने गमावली होती.
[ad_2]