Pakistan Team Out To World Cup 2023 Semi Final Scenario Team India World Cup Points Table Update Babar Azam Rohit Sharma Know All Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

World Cup 2023 Semi Final Scenario: भारताकडे (India) यजमानपद असलेल्या वनडे वर्ल्डकप (World Cup Semi Final 2023) सध्या रोमांचक वळणावर येऊन ठेपला आहे. वर्ल्डकपची स्पर्धा आता सेमीफायनल्सकडे कूच करतेय. स्पर्धेत आतापर्यंत 24 सामने खेळवण्यात आले असून आतापर्यंत चित्र बऱ्याच अंशी स्पष्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच, येत्या 6 दिवसांत म्हणजेच, 31 ऑक्टोबरपर्यंत सेमीफायनल्सचं चित्र जवळपास पूर्णपणे स्पष्ट होईल. 31 ऑक्टोबरला वर्ल्डकपमधील 31वा सामना खेळवला जाणार आहे. यादरम्यान 29 ऑक्टोबर रोजी टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (Team England) यांच्यातही सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकून भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सेमीफायनल्समधील आपलं स्थान जवळपास निश्चित करेल.

6 दिवसांत ‘हे’ संघ स्पर्धेतून आऊट 

यंदाचा वर्ल्डकप पाकिस्तानसाठी फारसा चांगला ठरलेला नाही. येत्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचं सेमीफायनलपर्यंत पोहोचणंही अवघड झालं आहे. 27 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. या सामन्यातही पाकिस्तानच्या विजयाची शक्यता कमीच आहे. बाबर आझमच्या नेतृत्त्वात खेळणारा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामना हरला तर मात्र पाकिस्तानच्या सर्व आशा संपुष्टात येतील.  

याशिवाय श्रीलंका, अफगाणिस्तान, नेदरलँड आणि बांगलादेश हे संघही सेमीफायनल्सच्या शर्यतीतून बाहेर पडणार असल्याचं जवळपास निश्चित दिसतंय. नेदरलँड आणि बांगलादेशनं आतापर्यंत 5 पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. तर अफगाणिस्ताननं 5 पैकी 2 सामने जिंकले आहेत. आता अफगाणिस्तानचा पुढचा सामना श्रीलंकेविरुद्ध आहे, ज्यात अफगाणिस्तानचा खूप कठीण आहे. यानंतर त्याला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचाही सामना करावा लागणार आहे. 

दक्षिण आफ्रिकेनंतर पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात 31वा सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामनाही पाकिस्तानसाठी सोपा नसेल. बांगलादेशचा संघ पाकिस्तानला पराभूत करु शकतो, असं मत अनेक क्रिडा विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे. त्यासोबतच 28 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. हा सामनाही निर्णायक होणार आहे. अशातच, 31 ऑक्टोबरला वर्ल्डकपमधील अनेक संघांचं भवितव्य ठरणार आहे.  

सेमीफायनल्समध्ये ‘हे’ 4 संघ पोहोचणार?

श्रीलंका संघानं आतापर्यंत 4 पैकी एकच सामना जिंकला आहे. त्यांचा पाचवा सामना आज (26 ऑक्टोबर) इंग्लंड विरोधात खेळवला जाणार आहे. या सामन्यात जो संघ पराभूत होईल, त्या संघाच्या स्पर्धेतील आशा जवळपास संपुष्टात येतील. कारण इंग्लंडनंही आतापर्यंत केवळ एकच सामना जिंकला आहे. 

वर्ल्डकप स्पर्धेच्या पॉईंट टेबलबाबत बोलायचं झालं तर, सध्या टीम इंडिया 10 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. यानंतर दक्षिण आफ्रिकेनं (8), न्यूझीलंडनं (8) आणि ऑस्ट्रेलियानं (6) गुण कमावले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता अव्वल-3 संघ उपांत्य फेरी गाठतील, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. तर ऑस्ट्रेलियाशिवाय चौथ्या स्थानासाठी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात लढत होऊ शकते. मात्र, या तिघांमध्ये ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा दिसत आहे.

वर्ल्डकपमध्ये 31 ऑक्टोबरपर्यंतचं शेड्युल

  • इंग्लंड विरुद्ध श्रीलंका : बंगळुरू : 26 ऑक्टोबर 
  • पाकिस्तान विरुद्ध दक्षिण अफ्रीका : चेन्नई : 27 ऑक्टोबर 
  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूजीलंड : धर्मशाला : 28 ऑक्टोबर 
  • बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स : कोलकाता : 28 ऑक्टोबर 
  • टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड : लखनौ : 29 ऑक्टोबर 
  • श्रीलंका विरुद्ध अफगानिस्तान : पुणे : 30 ऑक्टोबर 
  • पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश : कोलकाता : 31 ऑक्टोबर

[ad_2]

Related posts