Complete Schedule Of Ram Mandir Programme Various Events Planned From 15 To 22 January 2024 Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : भारताच्या इतिहासामध्ये 22 जानेवारी 2024 चा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल, कारण या दिवशी अनेक वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील (Ayodhya) त्यांच्या भव्य राम मंदिरात (Ram Mandir) निवास करतील. अयोध्येत आता श्रीरामाच्या अभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. संपूर्ण जग या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकाची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. 15 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधीत अनेक विधी होतील. राम मंदिर कार्यक्रमाचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 

15-22 जानेवारी 2024 दरम्यान राम मंदिरातील वेळापत्रक (Ram Mandir inauguration 2024 full schedule)

15 जानेवरी 2024 : मकर संक्रांतीच्या दिवशी खरमास संपतात. गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती म्हणजेच श्री रामाच्या बालस्वरूपाची मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. 
16 जानेवारी 2024 : या दिवसापासून रामललाच्या मूर्तीच्या निवासासाठी विधीही सुरू होतील.
17 जानेवारी 2024 : या दिवशी रामलल्लाची मूर्तीची नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. 
18 जानेवारी 2024 : या दिवसापासून अभिषेक विधी सुरू होईल. मंडप प्रवेश पूजा, वास्तुपूजा, वरुण पूजा, विघ्नहर्ता गणेश पूजा आणि मर्तिक पूजा होतील.
19 जानेवारी 2024 : राम मंदिरात यज्ञ अग्निकुंड स्थापन करण्यात येणार आहे. आग विशिष्ठ पद्धतीने पेटवली जाईल.
20 जानेवारी 2024 : राम मंदिराचे गर्भगृह 81 कलशांनी पवित्र केले जाईल, ज्यामध्ये विविध नद्यांचे पाणी जमा करण्यात आले आहे. वास्तुशांती विधी होईल.
21 जानेवारी 2024 : या दिवशी, यज्ञविधीमध्ये, विशेष पूजा आणि हवन दरम्यान, रामलल्लाला  125 कलशांसह दिव्य स्नान घालण्यात येईल. 
22 जानेवारी 2024 : या दिवशी मध्यकाळात मृगाशिरा नक्षत्रात रामलल्लाची महापूजा होणार आहे.

प्राण प्रतिष्ठा मुहूर्त (Ram Mandir Pran Pratishtha 2024 Muhurat)

अयोध्येतील राम मंदिरासाठी जवळपास पाच शतकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. 22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात रामलल्लाची मूर्ती स्थापन करण्याची वेळ असेल. प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त असेल.

हेही वाचा : 

संपूर्ण देशात 22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, ज्यांना निमंत्रण त्यांनीच सोहळ्याला या, पंतप्रधान मोदींचे राममभक्तांना आवाहन

टीप : येथे प्रदान केलेली माहिती केवळ गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. येथे नमूद करणे महत्त्वाचे आहे की ABPLive.com किंवा एबीपी माझा कोणत्याही माहितीचे समर्थन किंवा पुष्टी करत नाही. कोणतीही माहिती किंवा विश्वास लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

[ad_2]

Related posts