( प्रगत भारत । pragatbharat.com)
Ruchak-Kendra Trikon rajyog : ज्योतिषशास्त्रातील नऊ ग्रहांमध्ये मंगळ हा सर्वात प्रभावशाली मानला जातो. भूमी, धैर्य, शौर्य आणि उर्जेचा कारक मंगळ ज्यावेळी मार्ग बदलतो तेव्हा त्याचा मोठा परिणाम मानवी जीवनावर परिणाम दिसून येतो. दरम्यान मंगळाच्या गोचरमुळे 2 राजयोग तयार झाले आहेत, ज्यामुळे काही लोकांच्या आयुष्य आनंदाने भरून जाणार आहे.
16 नोव्हेंबरला मंगळाने वृश्चिक राशीत प्रवेश केलाय. त्यामुळे रुचक राजयोग आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. या दोन राजयोगांमुळे 3 राशींसाठी खूप भाग्यवान सिद्ध होणार आहे. जाणून घेऊया या राशींना कसा फायदा होणार आहे, ते पाहूया.
वृश्चिक रास
मंगळाच्या गोचरमुळे रुचक आणि केंद्र त्रिकोण राजयोगाची निर्मिती खूप भाग्यवान सिद्ध होऊ शकते. रूचक राजयोगामुळे धैर्य आणि शौर्यासोबत आदर वाढणार आहे. या काळात आर्थिक लाभ आणि तुमच्या कामात यश मिळेल. मालमत्ता खरेदी किंवा विक्री करू शकता. केंद्र त्रिकोण राजयोग व्यवसायात नफा मिळवून देईल. काही चांगली बातमी ऐकायला मिळणार आहे.
मकर रास
रूचक महापुरुष राजयोग लोकांसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. यावेळी उत्पन्न वाढेल, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. करिअरसाठी काळ अनुकूल राहील. आयात-निर्यातीत गुंतलेले व्यापारी चांगला नफा कमवू शकतात. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे त्यांना लाभ मिळू शकतो. या काळात कोर्टाचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो.
सिंह रास
रूचक महापुरुष राजयोग रहिवाशांसाठी फायदेशीर ठरू शकतात. तुम्हाला व्यवसाय आणि करिअरमध्ये चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. रिअल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल राहणार आहे. तुम्ही कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करू शकता. केंद्र त्रिकोण राजयोगामुळे कामात यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. नशीब तुमच्या बाजूने असेल. राजकारणातील लोकांना काही पद मिळू शकते.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )