[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Social Media Influencer: तुम्ही “दोन बायका फजिती ऐका” हा चित्रपट पाहिला असेल, या चित्रपटात दोन बायकांमुळे पतीची होणारी तारांबळ दाखवण्यात आली आहे. पण आता उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखनौमध्ये (Lucknow) देखील अशीच एक घटना घडली आहे. या घटनेत दोन बायका तर आहेतच पण नऊ मुलं आणि सहा गर्लफ्रेंड्स देखील आहेत. पोलिसांनी एका सोशल मीडियावर स्टारला सरोजिनी नगर येथील हॉटेलमधून अटक केली. या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं नाव अजित मौर्य असं आहे. दोन बायका, नऊ मुलं असं अजित मौर्यचं कुटुंब आहे. पण त्याला सहा गर्लफ्रेंड्स देखील आहेत. लखनौ पोलिसांनी अजित मौर्याला बेड्या ठोकल्या आहेत. हे नेमकं प्रकरण काय आहे? याबाबत जाणून हेऊयात…
अजित मौर्यवर आहेत ‘हे’ आरोप
द टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, अजित मौर्यवर पॉन्झी सारख्या बनावट योजना चालवणे, बनावट भारतीय नोटा चलनात आणणे, विमा योजनांद्वारे लोकांना फसवणे यांसारखे आरोप आहेत.
दोन बायका, नऊ मुलं अन् सहा गर्लफ्रेंड्स
सोशल मीडियावर रील बनवणाऱ्या अजित मौर्यला दोन बायका, 9 मुलं आणि 6 गर्लफ्रेंड्स आहेत. अजित मौर्यनं पोलिसांना सांगितलं की, कुटुंबाचे पोट भरण्यासाठी तो गुन्हेगारीच्या जगात आला. अजित मौर्यवर नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धर्मेंद्र कुमार नावाच्या एका व्यक्तीने अजित मौर्यविरुद्ध एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांना अजितच्या गुन्ह्यांची माहिती मिळाली.
सहावीत झाला नापास, मुंबईत फॉल्स सिलिंग बनवण्याचे केले काम
अजित मौर्य हा सहावीत नापास झाला होता. त्यानंतर तो मुंबईमध्ये कामाच्या शोधात आला होता. द टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सरोजिनी नगरचे एसएचओ शैलेंद्र गिरी यांनी सांगितले की, “मुंबईत प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करून फॉल्स सिलिंग बनवण्याचे काम अजित करत होता. पण त्या कामात त्याला यश मिळालं नाही.”
पोलिसांनी असेही सांगितले की, 2000 मध्ये अजितने मुंबईतील 40 वर्षीय संगीतासोबत लग्न केले. संगीता आणि अजित यांना सात मुले आहेत. 2010 मध्ये नोकरी गेल्यानं अजित हा पुन्हा त्याच्या गोंडा या गावी गेला. 2016 मध्ये गोंडा येथे चोरी आणि घुसखोरीचा पहिला गुन्हा अजितवर दाखल झाला. तेव्हापासून अजितने गुन्हे करण्यास सुरुवात केली. 2019 मध्ये अजितने सुशीलाशी लग्न केले. सुशीला आणि अजित यांना 2 मुले आहेत.
बायकांसाठी बांधली दोन घरे पण स्वत: राहतो भाड्याच्या घरात
तपासादरम्यान, पोलिसांना आढळून आले की अजितची दोन घरे आहेत, एकात संगीता राहते आणि दुसऱ्या घरात सुशीला राहते अजित हा स्वतः भाड्याच्या घरात राहतो. पोलिसांनी अजितचे कॉल डिटेल रेकॉर्ड स्कॅन केले, त्यात त्यांना लक्षात आले की अजितच्या सहा गर्लफ्रेंड्स आहेत.अजित विविध सोशल मीडियावर रिल्स शेअर करतो. त्याला अनेक लोक सोशल मीडियावर फॉलो देखील करतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Canada : 27 बायका फजिती ऐका! 65 वर्षाच्या पठ्ठ्यानं केली 27 लग्न, आज आहे 150 मुलांचा बाप
[ad_2]