Sanjay Raut Thackeray Group Leader Attacks On CM Eknath Shinde And DCM Devendra Fadanvis Said Eknath Shinde Should Understand Article 370 Nagpur Maharashtra Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नागपूर : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut Nagpur) यांची नागपुरात एंट्री होताच, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे यांनी 370 कलम आणि उपकलम समजून सांगावेत आणि मग या 370 कलमावर बोलावं, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते. 

शिवसेनेच्या स्वभावातच गुंडा गर्दी आहे. मात्र ती न्याय हक्कासाठी आहे. एकनाथ शिंदे यांनी 370 कलम आणि उपकलम समजून सांगावेत आणि मग या 370 कलमावर बोलावं, असं संजय राऊत म्हणाले. 

देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्लाबोल केला. “देवेंद्र फडणवीस म्हणतात नवाब मलिक यांना जो न्याय तो इतरांना सुद्धा लागू होईल. मात्र फडणवीस बोलतात तसं वागत नाहीत. त्याच्यामुळे अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना सुद्धा तोच न्याय मिळणार का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे”, असं संजय राऊत म्हणाले. 

देवेंद्र फडणवीसांनी मलिकांना महायुतीच्या सरकारमध्ये सामील न करुन घेण्यासाठी अजित पवारांना पत्र लिहिल्यानंतर राजकारणात एकच खळबळ माजली. दरम्यान जो न्याय आम्ही मलिकांना दिलाय, त्यांच्यावर जे आरोप आहेत. ते दुसऱ्या कोणावर असते तरी त्यांना हाच न्याय आम्ही दिला असता, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली होती. फडणवीसांच्या याच उत्तरावर राऊतांनी टीकास्र डागलं. 

डुप्लिकेट राष्ट्रवादी का घाबरतेय? 

 डुप्लिकेट राष्ट्रवादीने नवाब मलिक यांच्या बाजूने आता राहायला हवं. ते का घाबरतात माहित नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला अजित पवारांचा विरोध होता, हे मी सकाळीच बोललो आहे. कारण मी या सगळ्या प्रक्रियेचा भाग होतो म्हणून मी ठामपणे सांगतोय, असं संजय राऊत म्हणाले. 

एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी काय बोलतील हे गांभीर्याने घ्यायचं गरज नाही. राज्य सरकारमध्ये नेमकं काय सुरू आहे, त्यावर आम्ही प्रश्न विचारणार. इतिहासात काय झालं ही मोदी पॉलिसी आहे. शिवसेनेची गुंडगिरी ही न्यायासाठी आहे. शिवसेना मनाने गुंडा असतो मुख्यमंत्री हे काही दिवसाचे पाहुणे आहेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

हेही वाचा : 

Devendra Fadanvis : बाळासाहेब ठाकरेंनी  370 कलम हटवण्याची मागणी केली होती, मोदींनी ते स्वप्न पूर्ण केले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया 

[ad_2]

Related posts