( प्रगत भारत । pragatbharat.com)
Guru And Shukra Conjunction 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठरलेल्या वेळी ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. 2024 मध्ये अनेक ग्रहांची युती होणार असून यापैकी काही ग्रहांची युती शुभ ठरणार आहे. गुरू आणि बुध ग्रहांची नावं देखील समाविष्ट आहेत.
2024 च्या सुरुवातीला शुक्र ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी गुरु ग्रह आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत या दोन ग्रहांचा संयोग मेष राशीत होईल. या काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. चला जाणून घेऊया गुरु आणि शुक्राच्या युतीमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.
सिंह रास (Leo Zodiac)
शुक्र आणि गुरूचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. हा संयोग तुमच्या राशीवरून नशिबाच्या स्थानावर तयार होणार आहे. कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. हे गोचर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून देणारं असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी परदेशात जाण्याची इच्छा आहे त्यांना त्यांच्या प्रयत्नात यश मिळू शकते. तुम्ही देश-विदेशातही प्रवास करू शकता.
मिथुन रास (Mithun Zodiac)
बुध आणि गुरूची जोडी तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकणार आहे. उत्पन्नाच्या नवीन स्रोतातून पैसे मिळवण्यातही तुम्ही यशस्वी होणार आहात. नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे. काही व्यावसायिक करार अंतिम करू शकतात. तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमधून पैसे मिळू शकतात. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकणार आहेत.
कर्क रास (Cancer Zodiac)
करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुक्र आणि गुरूचा संयोग तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. हा संयोग तुमच्या राशीच्या कर्म घरावर तयार होणार आहे. व्यावसायिक जीवनातही तुमची प्रगती होणार आहे. पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी मिळणार आहे. बेरोजगारांना यावेळी नोकरी मिळू शकते. व्यवसायातही भरपूर यश आणि नफा मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक कलहातून तुम्हाला आराम मिळू शकणार आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)