IPL Auction 2024 Live Gujarat Titans All Rounder Azmatullah Omarzai Replacement Hardik Pandya

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL Auction 2024 Live : आयपीएल 2024 आधीच हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा मुंबईच्या ताफ्यात जायचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्याने कर्णधार म्हणून प्रभावी कामगिरी केलीच होती, पण गोलंदाजी आणि फलंदाजीतही त्याने शानदार कामगिरी केली आहे. दुबईमध्ये सुरु असलेल्या लिलावात गुजरात संघाने हार्दिक पांड्याची कमी भरुन काढण्याचा प्रयत्न केलाय. गुजरातने आजच्या लिलावात अष्टपैलू अजमतुल्लाह ओमरजई याला आपल्या ताफ्यात घेतलेय. हार्दिक पांड्याप्रमाणे तो फटकेबाजी करु शकतो, त्याशिवाय गोलंदाजीही करण्यास तो तरबेज आहे. अजमतुल्लाह ओमरजई याला संघात सामील करत गुजरातने हार्दिकची रिप्लेसमेंट करण्याचा प्रयत्न केलाय. 

अफगाणिस्तानचा अजमतुल्लाह ओमरजई याला खरेदी करत गुजरातने हार्दिक पांड्याची कसर भरुन काढली आहे. अजमतुल्लाह ओमरजई याला गुजरातने 50 लाख रुपयात गुजरातने घेतले. अजमतुल्लाह ओमरजई याची मूळ किंमत 50 लाख रुपये इतकीच आहे. 

नुकत्याच झालेल्या विश्वचषकात अजमतुल्लाह ओमरजई  याने प्रभावी कामगिरी केली होती. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीत महत्वाची भूमिका बजावली होती. अजमतुल्लाह ओमरजई  याच्यावर यंदाच्या लिलावात मोठी बोली लागेल, असा तर्क सर्वांनी व्यक्त केला होता. पण अजमतुल्लाह ओमरजई याच्यावर इतर संघाने विश्वास दाखवला नाही. गुजरात संघाने त्याला मूळ किंमतीमध्ये खरेदी केलेय. 

इरफानने दिला होता सल्ला – 

भारताचा माजी क्रिकेटर इरफान पठान याने गुजरातला घेण्याचा सल्ला दिला होता. इरफानच्या मते अजमतुल्लाह ओमरजई याला संधी द्यायला हवी. ओमरजई हार्दिक पांड्याची जागा घेऊ शकतो. 

अजमतुल्लाह ओमरजई याचं करियर – 

अझमतुल्ला उमरझाईची आतापर्यंतची कामगिरी पाहिली शानदार राहिली आहे.  त्याने 22 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात त्याने 4 अर्धशतकांसह 490 धावा केल्या. यासोबतच 13 विकेट्सही घेतल्या आहेत. ओमरझाईने 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 11 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय देशांतर्गत सामन्यांमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे.

Gujarat Titans Retained Players:  गुजरातचे टायटन्स कोण कोणते ?

अभिनव सदरंगानी, बी. साई सुधारसन, दर्शन नळकांडे, डेव्हिड मिलर, जयंत यादव, जोशुआ लिटल, केन विल्यमसन, मॅथ्यू वेड, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, नूर अहमद, आर. साई किशोर, राहुल तेवतिया, रशीद खान, शुभमन गिल, विजय शंकर, वृद्धिमान साहा, उमेश यादव, अजमतुल्लाह ओमरजई

Gujarat Titans Retained Players: Abhinav Sadarangani, B. Sai Sudharsan, Darshan Nalkande, David Miller, Jayant Yadav, Joshua Little, Kane Williamson, Matthew Wade, Mohammad Shami, Mohit Sharma, Noor Ahmad, R. Sai Kishore, Rahul Tewatia, Rashid Khan, Shubman Gill, Vijay Shankar, Wriddhiman Saha 

[ad_2]

Related posts