Karnataka Cm Swearing Ceremony Today Siddaramaiah As Cm Dk Shivakumar As Deputy Cm To Take Oath Marathi News Updates

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Karnataka CM Oath Ceremony : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेस आज सरकार स्थापन करणार आहे. काँग्रेस नेते सिद्धरमय्या (Siddaramaiah) आज कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार (DK Shivakumar) उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. मंत्रिमंडळात सामील होणारे काही आमदारही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. शपथविधी समारंभाच्या अगोदर, सिद्धरमय्या आणि शिवकुमार नवीन मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात येणार्‍या मंत्र्यांची नावे आणि खात्यांच्या वितरणाबाबत हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला पोहोचले आहेत. 

आज कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी

काही तासांत मुख्यमंत्री म्हणून सिद्धरमय्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून डीके शिवकुमार पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसकडून विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीला अद्याप जवळपास एक वर्ष बाकी असल्याने 2024 च्या निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या एकीचं प्रदर्शन म्हणून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याकडे पाहिलं जात आहे. 

सिद्धरमय्या आणि शिवकुमार राहुल आणि प्रियांका यांच्या भेटीला

सिद्धरमय्या आणि शिवकुमार यांनी शुक्रवारी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसने आपल्या अधिकृत हँडलवरून या बैठकीचे फोटो ट्विट केले आहेत. या फोटोला कॅप्शन देत लिहिलं आहे की, “कर्नाटकमधील लोकांच्या सरकारच्या शपथविधीपूर्वी एक बैठक.” तसेच सिद्धरमय्या यांनी दिल्लीत काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांचीही भेट घेतली.

सिद्धरमय्या नवे मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा बंगळुरूच्या श्री कांतीराव स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे. या स्टेडियममध्ये सिद्धरमय्या यांनी 2013 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. राज्यपाल थावरचंद गेहलोत दुपारी 12:30 वाजता कांतेराव स्टेडियमवर मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. 2013 मध्ये पाच वर्षांच्या कार्यकाळानंतर सिद्धरमय्या आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तसेच. शिवकुमार यापूर्वी सिद्धरमय्या यांच्या सरकारमध्ये मंत्री होते, ते पुढील वर्षी होणाऱ्या संसदीय निवडणुकीपर्यंत कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहतील.

news reels Reels

शपथविधीला दिग्गजांची उपस्थिती

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी, अनेक मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. योग्य संयोजन असलेलं मंत्रिमंडळ, सर्व समुदाय, प्रदेश, गट यांचे प्रतिनिधी आणि जुन्या आणि नव्या पिढीतील आमदार यांच्यात समतोल राखणे, हे नव्या मुख्यमंत्र्यांसमोरील आव्हान असेल.

महत्वाच्या इतर बातम्या :

Karnataka CM swearing-in ceremony: कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला देशातून कोणाकोणाला निमंत्रण? महाराष्ट्रातील दोन नेत्यांची नावे, देशातून कोण?

[ad_2]

Related posts