Maharashtra News 372 Answer Sheets Of HSC Exam With The Handwriting Of A Single Person Report Of The Inquiry Committee

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

HSC Exam Scam : बारावीच्या परीक्षेच्या (HSC Exam) भौतिकशास्त्र पेपर तपासणीमध्ये तीनशेहून अधिक विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेत दोन हस्ताक्षर असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली होती. तर चौकशी समितीचा अहवाल प्राप्त होताच एचएससी बोर्डासह शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली. कारण भौतिकशास्त्राच्या तब्बल 372 उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. त्यामुळे याबाबत तातडीने राज्य शिक्षण मंडळास कळविण्यात आले आहे. तर परीक्षेतील हा एक मोठा घोटाळा समजला जात आहे. 

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासत असताना भौतिकशास्त्र विषयाच्या सुमारे तीनशेहून अधिक विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेत दोन वेगवेगळे हस्ताक्षर असल्याचे समोर आले होते. सर्व प्रकरण संशयास्पद असल्याने याची माहिती शिक्षणमंडळाला देण्यात आली होती. दरम्यान शिक्षण मंडळाने या सर्व विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांना नोटीसा पाठवत, चौकशीसाठी बोलावले आहे. तसेच केंद्रप्रमुख यांना देखील बोलावून त्यांची देखील चौकशी करण्यात आली होती. मात्र दोन हस्ताक्षर कोणाचे हे स्पष्ट होऊ शकले नव्हते. मात्र आता चौकशी समितीचं अहवाल समोर आला असून, ज्यात भौतिकशास्त्राच्या तब्बल 372 उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिक्षण मंडळात खळबळ उडाली आहे. 

या प्रश्नांची उत्तरे मिळत नाही…

  • बीड आणि हिंगोली या दोनच जिल्ह्यांत हा सर्व प्रकार समोर कसा घडला आहे? 
  • भौतिकशास्त्राच्या 372 उत्तरपत्रिकांमध्ये एकसारखेच हस्ताक्षर कसे काय आले? 
  • त्यामुळे संबंधित सेंटरच मॅनेज झाले होते की, उत्तरपत्रिकाच बाहेर देण्यात आल्या होत्या? 
  • परीक्षा झाल्यावर ही उत्तरे लिहिण्यात आली का? 
  • प्रथमदर्शनी उत्तरपत्रिकांमध्ये अर्धवट राहिलेली उत्तरे एकाच व्यक्तीने लिहिलेली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे ती व्यक्ती कोण?

अशी झाली चौकशी…

हा सर्व प्रकार समोर आल्यावर 15 मे पासून परीक्षा केंद्र संचालकांची सुनावणी घेण्यात आली. हा प्रकार कुठे झाला. उत्तरपत्रिका जमा कधी केल्या, त्या कस्टडियनकडे कधी पाठवल्या, अशी केंद्र संचालकांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. त्यानंतर पर्यवेक्षक, कस्टडियनचीदेखील सुनावणी घेण्यात आली. आता मॉडरेटरची सुनावणी घेतल्यानंतर हा प्रकार कसा व कुठे घडला, या निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल. आताच उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी बाहेर दिल्या होत्या की, सेंटरमध्येच ते मॅनेज केले होते, हे समोर येण्याची शक्यता आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

HSC Exam Scam: बारावी परीक्षा घोटाळा! पेपर एकाचा अन् उत्तरे मात्र दुसऱ्यानेच लिहिले; विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

[ad_2]

Related posts