Lok Sabha Election Give Us As Many Seats As Shiv Sena Shinde Group NCP Ajit Pawar Group Demand Mahayuti BJP

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

 मुंबई :  शिवसेना (Shiv Sena ), राष्ट्रवादीतील (NCP)  बंडानंतर राज्याच्या राजकारणाला (Maharshtra Political Updates) अभूतपूर्व कलाटणी मिळाली. आगामी लोकसभेसाठी (Loksabha Election) भाजपची (BJP)  जागावाटपावरून डोकेदुखी वाढली आहे.  कारण जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा आम्हाला हव्यतात अशी मागणी अजित पवार गटाने घेतली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती एबीपीला दिली आहे.

आज संध्याकाळी देवगिरी निवासस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत आमदारांची बैठक होणार आहे. आगामी काळात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यात केंद्रीय मंत्री अमित शाह  यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होणार आहे. या बैठकीत महायुतीतील कोणत्या पक्षाला किती जागा देण्यात याव्यात या संदर्भात चर्चा होणार आहे. लवकरच या बैठकीची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

सत्तेत आम्ही समसमान वाटेकरी : अजित पवार गट

दरम्यान जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा आम्हाला हव्या अशी भूमिका अजित पवार गटाची आहे. सत्तेत आम्ही समसमान वाटेकरी आहोत अशी भूमिका अजित पवार गटाने घेतल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. महायुतीतील जागा वाटपासंदर्भात अजित पवार गटाने आपली भूमिका स्पष्ठ केली आहे. सध्या अजित पवार गटाचे 4 खासदार तर शिंदे गटाचे 13 खासदार आहेत. 

जानेवारी महिन्यात जागा वाटपासंदर्भात अमित शाहांसोबत चर्चा, प्रफुल पटेल यांची एबीपी माझाला माहिती

महायुतीत  भाजपचे 105 आमदार, एकनाथ  शिंदे यांचे 50 पेक्षा जास्त आमदार आणि आमच्या पक्षाचे 43 आमदार आहेत.  जानेवारी महिन्यात आमची जागा वाटपासंदर्भात अमित शहा यांच्यासोबत चर्चा होईल. याच महिन्यात बैठक अपेक्षित होती मात्र विविध राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार, लोकसभेचे अधिवेशन, महाराष्ट्रातलं विधानसभेचे अधिवेशन यामुळे बैठक लांबली. जानेवारी महिन्यात आमची महाराष्ट्रातल्या घटक पक्षांची बैठक होईल आणि त्यानंतर भाजप श्रेष्ठींसोबत एकनाथ शिंदे आणि आमच्या पक्षाचे नेते मिळून बैठक करतील आणि जागावाटप निश्चित होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल म्हणाले आहेत.  अजित पवार गटाकडून काही दिवसापूर्वी लोकसभा निवडणुकीत त्या नऊ जागा हव्यात या संदर्भात सूतोवाच करण्यात आले होते. अमित शाह यांच्या बोठकीनंतरच खऱ्या अर्थाने महायुतीतील जागा वाटपासंदर्भात स्पष्टता येणार आहे. 

हे ही वाचा :

ABP C voter Opinion Poll : एनडीए की ‘इंडिया’? देशात आता लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोणाचे सरकार स्थापन होणार? लोकांचा आश्चर्यजनक कौल

 

[ad_2]

Related posts