[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
ED Officials Attacked in West Bengal : पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगाणा जिल्ह्यात छापा मारण्यासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला (Attacked On ED officials) झाला. या हल्लेखोरांनी ईडीच्या अधिकाऱ्यांजवळील वस्तू आणि रोख रक्कम पळवली असल्याचे समोर आले आहे. आज झालेल्या हल्ल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी उत्तर 24 परगाणामध्ये झालेल्या हल्ल्याबाबतची माहिती दिली आहे.
पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यात शुक्रवारी (5 जानेवारी) रोजी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याबाबत तपास यंत्रणेने मोठा दावा केला आहे. ईडीने सांगितले की, आमच्या पथकावर 800 ते 1000 लोकांनी हल्ला केला होता. यावेळी हल्लेखोरांनी मोबाईल, लॅपटॉप आणि रोख रक्कम लुटली.
ईडीने सांगितले की, “ईडी पश्चिम बंगाल पीडीएस घोटाळ्याप्रकरणी उत्तर 24 परगणा टीएमसीचे नेते शाहजहान शेख यांच्याशी संबंधित 3 परिसरांची झडती घेत होते. या झडतीदरम्यान, ईडी टीम आणि सीआरपीएफ जवानांवर 800-1000 लोकांनी त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने एका कॉम्प्लेक्समध्ये हल्ला केला. हल्ला करणारे हे लाठ्या, दगड आणि विटा यांसारख्या शस्त्रांनी सज्ज होते, असेही ईडीने म्हटले.
ED was conducting searches on the three premises of Sahajahan Sheikh, Convenor of TMC, North 24 Parganas in case of PDS scam of West Bengal. During the searches. On one of the premises, ED team with CRPF personnels was attacked by 800-1000 people with an intention to cause death…
— ED (@dir_ed) January 5, 2024
ईडीने पुढे सांगितले की, “या घटनेत ईडीचे तीन अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी ईडी अधिकाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हिंसक जमावाने मोबाईल फोन, लॅपटॉप, रोख रक्कम आदी ED अधिकार्यांचे वैयक्तिक आणि अधिकृत सामान हिसकावले/लुटले/चोरले. ईडीच्या काही वाहनांचेही मोठे नुकसान झाले असल्याचे ईडी अधिकाऱ्यांनी म्हटले.
वाहनांची तोडफोड करून हल्ला
टीएमसी नेते शाहजहान यांच्या समर्थकांनी ईडी अधिकाऱ्यांवर हल्ला केला आणि त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. रेशन घोटाळा प्रकरणाच्या तपासासंदर्भात तपास यंत्रणा उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील शाहजहानच्या निवासस्थानावर छापा टाकण्यासाठी आली होती.
[ad_2]