‘इंडिया आघाडीचं सोडा, महाराष्ट्रातही आघाडी होणार नाही’; ‘या’ नेत्याचा मोठा दावा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sanjay Shirsat छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारी करताना दिसून येत आहे. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) गेल्या काही दिवसांपासून जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. यावरून शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. इंडिया आघाडीचा प्रश्न येतच नाही. महाराष्ट्रातही आघाडी होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले की, तुम्हाला मी एक सांगतो की, ही आघाडी कधीही होणार नाही. ते वंचितलाही बरोबर घेत नाहीत. राजू शेट्टींदेखील बरोबर घेत नाही. आता काँग्रेस देखील त्यांच्याबरोबर युतीमध्ये लढायला तयार नाही. हे सगळे जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट एखादा यांचा प्रवक्ता म्हणजे उभाठा गटाचा देतो. त्यावरती हे सगळे चालू आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की, ही आघाडी होणारच नाही हे माझं ठाम मत आहे. इंडिया आघाडीचा प्रश्न येतच नाही आणि महाराष्ट्रात सुद्धा आघाडी होणार नाही. तुम्ही 26-27 तारखेपर्यंत वाट पाहा आणि मग तुम्हालाच कळेल की युती कशी होते, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. 

आघाडी होणार नाही

यांचे जे काही भांडण आहे. उभाठा गटाचं जे काही अस्तित्वात कमी झाले आहे. त्यामुळे निश्चितच काँग्रेसला जास्त जागा पाहिजे आणि त्या घेतल्याशिवाय काँग्रेस थांबणार नाहीत. शरद पवार यांना सुद्धा माहिती आहे की, आपल्याला आपल्या अस्तित्वाची लढाई जर लढायची असेल तर काही जागा या आपल्या पदरात आल्याच पाहिजे. प्रकाश आंबेडकर आहेत त्यांचा इतका मोठा सपोर्ट महाविकास आघाडीला मिळत आहे. त्यांच्याही पारड्यात काहीतरी पडलं पाहिजे ना. प्रकाश आंबेडकरांना सुद्धा चांगल्या जागा दिल्या तर ते युती करतील. प्रत्येकाच्या एक महत्त्वकांक्षा आहे. त्यामुळे मी वारंवार सांगत आलेलो आहे की, आघाडी होणार नाही असे त्यांनी म्हटले. 

मनोहर जोशींसोबत काम करण्याचा अनेक वर्षांचा अनुभव

राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले. याबाबत संजय शिरसाट म्हणाले की, त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनेक वर्षाचा आम्हाला अनुभव आहे. त्यांना आम्ही एकदम जवळून पाहिलेले आहे. 1988 च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये संभाजीनगरमध्ये त्यांनी पक्षाचा प्रचार केलाय. दुर्दैवाने त्यांच्या जीवनात एक दिवस असा आला की, शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्याच्या सभेतून इतरांनी त्यांना उतरवलं आणि त्यांना आघात इतका झाला की, त्यानंतर शिवसेनेच्या कोणत्याही मेळाव्याला जाहीर सभेला ते कधी बोलले नाही. अनेक वेळा त्यांना असं वाटायचं की, राज ठाकरे बाहेर गेलेले आहे. त्यांनी सोबत काम करावे, अशी भूमिका ज्यावेळी ते मांडायला गेले त्यावेळी सुद्धा त्यांना खूप विरोध केला गेला, असे त्यांनी म्हटले. 

युतीबाबत बोलणी झालेली नाही

 आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया गजानन किर्तीकर यांनी दिली होती. यावर संजय शिरसाट म्हणाले की, आमची युतीची कोणत्याही प्रकारची बोलणी झालेली नाही आणि ती युती जेव्हा होईल त्यावेळी ते चित्र स्पष्ट होईल. परंतु फॉर्मुला असाच ठरलेला आहे की, ज्यांनी ज्या जागा पूर्वी लढलेल्या आहेत त्या जागा आम्हीच लढणार आहोत. आता फक्त आमच्याबरोबर आलेले अजित दादा यांची असलेली डिमांड की आम्ही दोन्ही पक्षांना सामोपचाराच्या नंतर निर्णय घेण्यात येईल. म्हणून आमच्याकडे वाद होण्याची शक्यता नाही, असं मला वाटतं.

रवींद्र वायकर जास्त काळ तिथे राहणार नाहीत

संजय शिरसाट यांनी रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता. यावर त्यांना विचारले असता ते म्हणाले की, या बाबतीत तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल.अनेक जण इतरांच्या सांगण्यावरून गैरव्यवहारांमध्ये अडकलेले आहेत. त्यांना आता तिथून बाहेर पडायचे आहे. म्हणून वायकर आता जास्त काळ तिथे राहणार नाही हे मात्र निश्चित आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री झाल्यावर लोक सत्तेसाठी हपापलेला नेता म्हणतील, ही भीती होती; फडणवीसांनी सांगितली मनातली घालमेल

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts