हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणजे यावली ची चाँदपीर यात्रा….

30/5/2024 गुरुवार संदल 31/5/2024 धमाका म्युझिकल कोल्हापूर व गावात देव मिरवणूक व शोभेची दारू

सोलापूर:बार्शी तालुक्यातील यावली येथे दिनांक 30 मे पासून यात्रा सुरु होत आहे इथलं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे या देवाचा पुजारी एक मराठा व्यक्ती आहे आणि सदरील यात्रा गावातील संपूर्ण समाज एकवटून मोठ्या थाटामाटात साजरी करतात….सालाबादप्रमाणे याहीवर्षी यात्रा होत असुन आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे दिनांक 30 मे रोजी देवाचा संदल होणार आहे तसेच याच दिवशी चाँदपीर देवस्थान जवळ अन्नदान करण्यात येते तर 31 मे रोजी यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे या दिवशी गावातून देवापर्यंत श्रद्धाळू भक्तगन ओल्या अंगाने लोटांगन घालतात गावापासून देवापर्यंत चे अंतर साधारण 2 km आहे तरीपण हि सेवा सर्व धर्मातील गावकरी करतात…31 मे रोजी संध्याकाळी कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध धमाका ऑर्केस्ट्रा आणि ताफे असणार आहेत आणि संपूर्ण गावातून देवाच्या घोड्याची सवाद्य मिरवणूक होते तसेच शोभेचे दारूकाम करण्यात येते तर 1 जून म्हणजे यात्रा सांगता दिवस यादिवशी गावातील महिलांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्यात येतो व शांततेत यात्रा पार पाडली जाते.यात्रा कमिटी व प्रमुख बापु तुरे सर, सचिन उकरंडे, जयहिंद खरात गुरुजी, शरद कळबट सर, पत्रकार निलेश उबाळे. अशी माहिती साप्ताहिक प्रगत भारत वृत्तपत्रकाचे संपादक व प्रगत भारत न्यूज पोर्टलचे दत्तात्रय कांबळे यांना सांगितले आहे

Related posts