सांगली (pragatbharat.com): लोकसभा निवडणुकीतील चित्र पाहता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी वारंवार यावे. जेणेकरून, राज्यात लोकसभा निवडणूक निकालाची पुनरावृत्ती होऊन महाविकास आघाडीचा विजय सुकर होईल, असा टोला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी भाजपला लगावला. सध्या राज्यात सत्ता बदलासाठी अनुकूल वातावरण असल्याचेही पवार यांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट सांगितले. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी राज्यात १८ प्रचार सभा घेतल्या. त्यापैकी, १४ ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. आता त्यांनी विधानसभेलाही राज्यात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात म्हणजे महाविकास आघाडीला त्याचा फायदा होईल, असे पवार यावेळी म्हणाले.
Related posts
-
भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड जिल्हाकार्यकारी अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल शत्रुघ्न काटे यांचे स्वागत व जाहीर सत्कार
चिंचवड, दि. 05 (pragatbharat.com) : भारतीय जनता पार्टी शहर कार्यालयात कोअर समितीचे सर्व सदस्य, सर्व जिल्हा... -
दिवाळीनिमित्त वैयक्तिक भेटीवर कलाटे यांचा भर
वाकड, ता. ३१ :(pragatbharat.com) सर्वत्र दिवाळीची धामधूम, उत्साह व आनंदाचे वातावरण आहे. मात्र राजकीय चर्चा मतदारसंघातील... -
– संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी ‘राम कृष्ण हरी’ मंत्र अवघ्या महाराष्ट्राला दिला – वसंत बोराटे
भोसरी 31 ऑक्टोबर:(pragatbharat.com) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध कामात भ्रष्टाचार करून रिचवलेला कोट्यावधींचा पैसा आखाड पार्ट्यांमधून कोणी...