मुंबई (pragatbharat.com):-महाराष्ट्रातील होणाऱ्या विधानसभा निवडणूक पूर्व चर्मकार समाजाच्या सर्व मागण्या मान्य न केल्यास राष्ट्रीय चर्मकार महासंघ ही संघटना लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून आपल्या मागण्यांसाठी अन्याय हक्कासाठी शासनाच्या विरोधात आंदोलन करेल असे जाहीर आवाहन व माहिती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी समाज कल्याण मंत्री बबनराव उर्फ नानासाहेब घोलप यांनी येथे सांगितले
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा भव्य आठवण मोर्चा काढण्यात आला.*या मोर्चा मध्ये राज्य भरातील चर्मकार समाजातील हजारो चर्मकार बंधू – भगीनीं मोठ्या संख्यने सहभागी झाले.दिनांक १२/२/२०२४ झालेल्या बैठकीत,मान.मुख्यमंत्री व नानासाहेब यांच्यासह राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मुख्य पदाधिकारी यांनी मान.मुख्यमंत्री एकनाथ शिंदें साहेब व समाज कल्याण मुख्य सचिव श्री.सुमंत भांगे साहेब यांच्यासह चर्मकार समाजाच्या २४ मागण्यांवर सविस्तर चर्चा केली होती.*प्रधान सचिव विजय वाघमारे यांच्या सोबत झालेल्या चर्चेत आचार संहितेपूर्वी या मागण्यांची पुर्तता करण्यात येईल.असे आश्वासन दिले.
आपणा सर्वांचे मोर्चात मोठे योगदान झाले.मैदानावर उपस्थित राहून मोर्चा यशस्वी केल्याबद्दल सर्वाचे मनापासून अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.आभार* *राष्ट्रीय चर्मकार महासंघ**राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सर्व नेते,राष्ट्रीय/राज्य/पदाधिकाऱ्यांसह जिल्हा अध्यक्ष यांनी अथक प्रयत्न, परिश्रम घेऊन मुंबई सह महाराष्ट्र राज्यातील चर्मकार समाज बांधव नानासाहेब यांच्या आदेशानुसार आझाद मैदानावर हजारोच्या संख्येने उपस्थित राहून मोर्चात सहभाग घेऊन मोर्चा यशस्वी केल्याबद्दल सर्वांनाचे मनापासून अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.व खूप खूप धन्यवाद.जय रविदास जय भिम जय संविधान जय महाराष्ट्र.**सरोजताई बिसुरे.राष्ट्रीय महिला अध्यक्ष.