pune News IndiGo launches direct flights from Pune to Surat from March 31 Know the schedule here

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुणे ते सुरत प्रवास (Pune to Surat Flight) करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता पुणे ते सुरत प्रवास सोपा होणार आहे. इंडिगो एअरलाइन्सने पुणे विमानतळापर्यंत आपली कनेक्टिव्हिटी (Pune Airport)विस्तारली आहे. कंपनीने पुणे ते सुरत अशी थेट विमानसेवा सुरू केली असून आठवड्यातून तीन दिवस मंगळवार, गुरुवार आणि रविवारी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. 31 मार्च 2024 पासून ही थेट विमानसेवा सुरू होणार आहे.प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी आणि प्रवास त्रासमुक्त व्हावा यासाठी हा थेट विमान सेवा सुरु करण्यात आली आहे. प्रस्थान प्रवासाला एकूण एक तास लागेल आणि परतीच्या प्रवासाला एकूण 55 मिनिटे लागतील. 

पुणे ते सुरत आणि सुरत ते पुणे या प्रस्थान व परतीच्या प्रवासाची वेळा

प्रस्थान (पीएनक्यू ते एसटीव्ही) – प्रस्थान – 12:55 वाजता, आगमन – 14:00 वाजता

परतीचा प्रवास (एसटीव्ही ते पीएनक्यू) – प्रस्थान – 12:55 वाजता, आगमन – 14:00 वाजता 

https://www.goindigo.in/domestic-flights/pune-to-surat-flights.html

पुणे ते सुरत दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा नवीन आणि थेट मार्ग गेमचेंजिंग ठरणार असून यामुळे प्रवासाच्या वेळेची बचत होणार आहे.  शिवाय, यामुळे दोन्ही शहरांमधील आर्थिक संबंधांना चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. हा निर्णय पाहून अनेक प्रवाशांनीदेखील आनंद व्यक्त केला आहे. 

 विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं लवकरत उद्घाटन

मागील काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पुणे विमानतळाच्या (Pune Airport) नव्या टर्मिनलच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त लागला आहे. येत्या 10 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर 4 ते 6 आठवडे सुरक्षा चाचण्या पूर्ण केल्यानंतर नव्या टर्मिनलवरून उड्डाण सुरु करण्यात येणार आहे.पंतप्रधान मोदी एकाच वेळी ग्वाल्हेर, पुणे, आदमपूर, कोल्हापूर, जबलपूर, दिल्ली, लखनऊ या विमानतळांवरील नवीन टर्मिनल आणि अलिगड, आझमगड, चित्रकूट, मुरादाबाद आणि श्रावस्ती या विमानतळांचे उद्घाटन करणार आहेत. तसेच, वाराणसी, कडप्पा, हुबळी आणि बेळगाव या विमानतळांच्या नवीन टर्मिनलचे भूमिपूजन करणार आहेत. हे प्रकल्प एकूण 12 हजार 700 कोटी रुपयांचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 10 मार्चला दुपारी 12 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन होईल.

इतर महत्वाची बातमी-

Supriya Sule On Devendra Fadanvis : व्यक्तीचा स्तर जनता ठरवते, अब की बार गोळीबार सरकार; फडणवीसांच्या पवारांवरील टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts