BCCI Warns Team India Support Staff After Wtc Loss Head Coach Rahul Dravid Vikram Rathour And Bowling Coach Paras Mhambrey Asia Cup 2023 Cricket Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

BCCI Warns Indian Team Support Staff : भारताकडून दुसऱ्यांदा जागतिक कसोटी विश्वचषकाचं (ICC World Test Championship) विजेतेपद हुकलं आहे. टीम इंडिया (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप अंतिम सामन्यापर्यंत (WTC Final 2023) पोहोचली पण, भारतीय संघाला विजय मिळवता आला नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील (WTC) पराभवानंतर टीम इंडियाच्या (Team India) खेळांडूसह आता सपोर्ट स्टाफवरही (Team India Support Staff) टीका करण्यात येत आहे. BCCI ने भारताच्या पराभवानंतर टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफला इशारा दिला आहे.

WTC फायनलमधील पराभवानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडला BCCI कडून इशारा

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) वनडे वर्ल्ड कप 2023 आधी मोठा बदल करण्याची शक्यता आहे. WTC अंतिम सामन्यातील टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर BCCI कडून हालचाली सुरु आहेत. इनसाइड स्पोर्ट्समध्ये प्रकाशित रिपोर्टमध्ये बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आगामी एकदिवसीय विश्व 2023 (ODI World Cup 2023) लक्षात घेऊन, WTC मधील पराभवानंतर फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांच्याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

गोलंदाजी आणि फलंदाजी कोचबाबतही मोठा निर्णय होण्याची शक्यता

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी याबाबत म्हटलं आहे की, या सर्व गोष्टी इतक्या सोप्या नाहीत. सर्व काही ठीक नव्हतं असं आपण म्हणू शकत नाही. आम्ही भारतात जिंकण्यात यशस्वी झालो. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणे ही सोपी गोष्ट नाही. पण परदेश दौऱ्यांमध्ये संघाची अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली नाही. दरम्यान, आपण आगामी वनडे वर्ल्ड कप अवघ्या 4 महिन्यांवर आहे. याबाबत अंतर्गत पातळीवर नक्कीच चर्चा होईल.

 

[ad_2]

Related posts