ipl 2024 dc vs rr khaleel ahmed after kuldeep yadav demands drs to rishabh pant what happened

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

जयपूर :दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals ) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यातील आयपीएलचा नववा सामना काल जयपूरमध्ये पार पडला. दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन रिषभ पंतनं (Rishabh Pant) टॉस जिंकून राजस्थानला बॅटिंगला पहिल्यांदा आमंत्रित केलं होतं. दिल्लीच्या गोलंदांजांनी सुरुवातीला मॅचवर पकड मिळवली होती. राजस्थानच्या तीन विकेट 36 धावांमध्ये गेल्या होत्या. यानंतर रियान पराग यानं आर अश्विन, ध्रुव जुरेल आणि हेटमायर यांच्यासोबत केलेल्या भागिदारीमुळं राजस्थाननं 5 विकेटवर  185 धावा केल्या होत्या. डीआरएस घेण्यावरुन रिषभ आणि खलील अहमदचं (Khaleel Ahmed ) संभाषण चांगलंच चर्चेत आहे. 

रिषभ पंतनं 15 व्या  ओव्हरमध्ये बॉलिंग खलील अहमदला दिली होती. खलील अहमदनं पहिलाच बॉल ध्रुव जुरेलला टाकला. हा बॉल बॅटला स्पर्श करुन जुरेलच्या पॅडवर आदळला. यामुळं खलील अहमदनं एलबीडब्ल्यू बाद असल्याचं अपील केलं. खलील अहमदनं जोरदार अपील केलं मात्र पंचांनी त्याला बाद दिलं नाही. यानंतर खलील अहमद रिषभ पंतकडे गेला.खलील अहमदनं रिषभ पंतला 15 सेकंदांच्या काळात विनवणी करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतं आहे. 

खलील अहमदनं रिषभ पंतला डीआरएस घेण्याची विनंती केली. मात्र, रिषभ पंतनं खलील अहमदची विनंती मान्य केली नाही.

रिषभचा निर्णय बरोबर 

रिषभ पंतनं खलील अहमदची विनंती मान्य केली नाही.खलील रिषभला डीआरएस  घे म्हणत होता. मात्र, रिषभनं त्याला म्हटलं की तू सांगणार का बॅट आहे की नाही, असं म्हटलं. रिषभनं डीआरएस  न घेण्याचा घेतलेला निर्णय योग्य ठरला. रिषभ पंतनं डीआरएस घेतला असता तर  दिल्लीनं रिव्यू गमावला असता. 

कुलदीपचा प्रयत्न यशस्वी 

दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन रिषभ पंतनं आठवी ओव्हर कुलदीप यादवला दिली होती. यावेळी राजस्थानचा जोस बटलर फलंदाजी करत होता. कुलदीप यादवनं टाकलेला बॉल बटलरच्या पॅडवर जाऊन आदळला. कुलदीपनं यावेळी रिषभला डीआरएस घेण्याची विनंती केली. लगेचच त्यानं  रिषभ पंतकडे जाऊन स्वत:चं रिषभच्या हातानं डीआरएसचा इशारा केला. कुलदीप यादव याचा हा प्रयत्न यशस्वी ठरला. राजस्थानला जोस बटलरच्या रुपानं तिसरा धक्का बसला होता. 

दिल्लीला पहिल्या विजयाची प्रतीक्षा 

दिल्ली कॅपिटल्सच्या टीमला पहिल्या दोन मॅचमध्ये विजय मिळवता आलेला नाही.  पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध पराभूत झाल्यानंतर दिल्लीचा सामना आता चेन्नई विरुद्ध होणार आहे.या मॅचमध्ये तरी दिल्ली पहिला विजय मिळवणार का हे पाहावं लागणार आहे. दिल्लीच्या टीममध्ये रिषभ पंतनं चारशेहून अधिक दिवस क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर कमबॅक  केलं आहे.  

संबंधित बातम्या :

IPL 2024 :तीन दिवसांपासून बेडवर, गोळ्या खाऊन दिल्लीची धुलाई, मॅचविनर रियाग परागनं सगळं सांगून टाकलं…

IPL 2024 : अश्विननं दिवस गाजवला पण बॅटिंगनं, रोहित शर्मा स्टाइल फटकेबाजी, थँक्स अश्विन अण्णा, राजस्थानचं विशेष ट्विट

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts