Lifestyle Thalassemia Health marathi news sensitivity of Devendra Fadnavis Vedant Thackeray disease is cured Fadnavis tweet about inspiring story

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Thalassemia : या जगात परिस्थितीवर मात करून, खचून न जाता लढणारे फार कमी असतात. मात्र त्यापैकीच एक म्हणजे रायगड (Raigad) जिल्ह्यातील कर्जत येथे राहणारा वेदांत ठाकरे (Vedant Thackeray)… या 13 वर्षाच्या मुलाने जणू मोठी अग्निपरीक्षाच पास केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एवढ्या लहान वयात मृत्यूला परतवून लावणाऱ्या वेदांतचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. वेदांतच्या या खडतर प्रवासात त्याला साथ लाभली ती म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची.. देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलतेमुळे ‘वेदांत ठाकरे’ हा थॅलेसेमिया (Thalassemia) सारख्या दुर्गम आजारावर मात करणारा ‘सुपर हिरो’ ठरलाय.  वेदांतने या गंभीर आजारावर यशस्वी मात केली असून, त्याच्या या प्रेरणादायी प्रवासाबाबत खुद्द फडणवीस यांनी ट्विट करत वेदांतचं भरभरून कौतुकही केलंय.

प्रेरणादायक प्रसंगाची खुद्द फडणवीसांनीच ट्विट द्वारे दिली माहिती

देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय, ज्यात ते म्हणाले, “काही महिन्यांपूर्वी वेदांतच्या पालकांनी एका भाजप कार्यकर्त्यामार्फत मला संपर्क केला. थॅलेसेमियामुळे वेदांतवर उद्भवलेली कठीण व गंभीर परिस्थिती त्यांनी मांडली. माझ्या कार्यालयाने प्रयत्न केले. वेदांतवर मुंबईत उपचार सुरु झाला. या आजाराचा उपचार म्हणजे जणू एक कठीण परीक्षाच! पण वेदांत हिमतीने पुढे गेला..आणि आज थॅलेसेमिया सारख्या गंभीर आजारावर मात केलेल्या वेदांतने कुटुंबासमवेत माझ्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. वेदांत आणि त्याच्या कुटुंबियांच्या या खडतर प्रवासात मी त्यांची साथ देऊ शकलो, याबद्दल मी स्वतः ला भाग्यवान समजतो.”

 

 

 

थॅलेसेमिया म्हणजे काय? लहान मुलांना त्याचा कसा परिणाम होतो? त्यावर उपचार काय?

‘वेदांत ठाकरे’ हा थॅलेसेमिया आजारावर मात करणारा सुपर हिरो ठरलाय, पण हा ‘थॅलेसेमिया’ म्हणजे नेमका काय आजार आहे? लहान मुलांवर त्याचा कसा परिणाम होतो आणि त्यावर उपचार काय? हे आपण जाणून घेऊया..थॅलेसेमियाचे दोन प्रकार आहेत. जर मुलाच्या आई-वडिलांच्या गुणसुत्रांमध्ये किरकोळ थॅलेसेमियाही झाला असेल, तर त्या मुलाला मेजर थॅलेसेमिया होऊ शकतो. जो अत्यंत घातक आहे. पण जर दोघांपैकी फक्त एका पालकाला मायनर थॅलेसेमिया असेल तर मुलाला धोका नाही. थॅलेसेमिया हा रक्ताचा विकार आहे. जो मुलांना पालकांकडून वारशाने मिळतो. या आजारामुळे शरीरातील हिमोग्लोबिन निर्मिती प्रक्रिया विस्कळीत होते, त्यामुळे अशक्तपणाची लक्षणे दिसतात. वयाच्या तीन महिन्यांनंतरच त्याची ओळख पटते. यामध्ये रुग्णाच्या शरीरात रक्ताची तीव्र कमतरता असते, त्यामुळे त्याला वारंवार बाहेरून रक्ताची गरज भासते. आई-वडील दोघांनाही किरकोळ आजार असला, तरी मुलाला हा आजार होण्याची 25 टक्के शक्यता असते. त्यामुळे विवाहापूर्वी स्त्री-पुरुष दोघांनीही याबाबतीत स्वतःची चाचणी घेणे गरजेचे आहे.

Thalassemia : देवेंद्र फडणवीसांच्या संवेदनशीलतेमुळे 'ठाकरे' चा आजार बरा! प्रेरणादायक प्रवासाबाबत फडणवीस म्हणतात...

थॅलेसेमियाची लक्षणे काय?

-मुलांची नखे आणि जीभ पिवळी पडल्याने काविळ झाल्याचा भास होणे
-मुलाच्या जबड्यात आणि गालांमध्ये असामान्यता विकसित होते.
-मुलाची वाढ थांबते आणि तो त्याच्या वयापेक्षा खूपच लहान दिसतो.
-चेहरा कोरडा पडणे, वजन न वाढणे, नेहमी आजारी दिसणे, अशक्तपणा, -श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी लक्षणे दिसतात.

थॅलेसेमिया पासून खबरदारी कशी घ्याल?

थॅलेसेमियाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रक्त आणि औषधे आवश्यक असतात. या कारणास्तव, प्रत्येकजण त्यावर उपचार करण्यास सक्षम नसतो, भविष्यात हा आजार मुलाच्या जीवनासाठी धोका ठरू शकते. जसजसे वय वाढते तसतशी रक्ताची गरजही वाढते.

-विवाहापूर्वी स्त्री आणि पुरुष दोघांची रक्त तपासणी करून घेणे आवश्यक
-गर्भधारणेदरम्यान याची तपासणी करा.
-रुग्णाचे हिमोग्लोबिन 11 किंवा 12 राखण्याचा प्रयत्न करा.
-वेळेवर औषधे घ्या आणि उपचार पूर्ण करा.

Thalassemia : देवेंद्र फडणवीसांच्या संवेदनशीलतेमुळे 'ठाकरे' चा आजार बरा! प्रेरणादायक प्रवासाबाबत फडणवीस म्हणतात...

थॅलेसेमिया उपचार

थॅलेसेमिया आजाराची तीव्रता, आरोग्य समस्या आणि इतर लक्षणांनुसार उपचार केले जातात. थॅलेसेमियाच्या उपचारांमध्ये प्रामुख्याने खालील उपचारांचा समावेश होतो-

-रुग्णाला दर दोन ते तीन आठवड्यांनी रक्त द्यावे लागते, ज्यामुळे त्याच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होण्यापासून रोखते. वारंवार रक्त संक्रमणामुळे शरीरातील लोहाची पातळी वाढते, ज्याला लोह ओव्हरलोड म्हणतात. लोहाचे प्रमाण वाढल्यामुळे हृदय आणि यकृतासह शरीरातील अंतर्गत अवयव खराब होऊ लागतात. या अवस्थेचा उपचार करण्यासाठी, रुग्णाला विशेष औषधे दिली जातात, ज्याच्या मदतीने शरीरातून मूत्राद्वारे अतिरिक्त लोह काढून टाकले जाते.

-याशिवाय, निरोगी आहार आणि इतर पूरक आहार (जसे की फॉलिक ऍसिड) इत्यादी देखील रुग्णाला दिले जातात, ज्यामुळे शरीराला निरोगी लाल रक्तपेशी निर्माण करण्यास मदत होते.

-थॅलेसेमियासाठी बॉन मॅरो किंवा हेमॅटोपोएटिक सेल प्रत्यारोपणाची देखील शक्यता आहे. या प्रत्यारोपणामध्ये थॅलेसेमिया-उत्पन्न करणाऱ्या पेशी नष्ट करण्यासाठी उच्च केमोथेरपीचा समावेश होतो, ज्यानंतर जो दाता असतो, त्याच्याकडून निरोगी पेशी घेऊन बदलल्या जातात. दाता ही अशी व्यक्ती असली पाहिजे, ज्याचे मानवी ल्युकोसाइट प्रतिजन (HLA) रुग्णाशी जुळेल. या आजाराने त्रस्त रुग्णांच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी आता भारतात बोन मॅरो डोनर रजिस्ट्री उघडण्यात आली आहे.

-थॅलेसेमियाचा पूर्णपणे सामना करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आणि त्यांनी सुचविलेल्या उपायांचे पालन करणे आवश्यक आहे. या आजाराविरुद्ध लढण्यासाठी समाजासोबत मिळून काम करणे आवश्यक आहे.

 

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Dumping Syndrome : एक अशी मुलगी, जिला पोटच नव्हतं! होती उत्कृष्ट शेफ, पोटाशिवाय 12 वर्षे आयुष्य काढले

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts