maratha protest meeting in chhatrapati sambhajinagar allegations against chandrakant khaire

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगरमध्ये मराठा समजाच्या (Maratha Meeting)  समन्वयकांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीत राडा झाल्याचे समोर आले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचे पैसे घेऊन काही लोक या बैठकीत आले होते, असा आरोप या बैठकीतील समन्वयकांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीदरम्यान दोन गटांत हाणामारी (Sambhaji Nagar Maratha Meeting Clash) झाली आहे. या बैठकीत बाहेरचे लोक आल्याचे म्हटले जात आहे. दोन गटांत ही मारामरी झाल्यांतर ही बैठक आता तात्पुरती थांबवण्यात आली आहे.

संभाजीनगरच्या बैठकीत नेमकं काय झालं?

संभाजीनगरमध्ये मराठा समाजाची समन्वय बैठक होती. संभाजीनगर लोकसभेतून मराठा समाजाचा एक उमेदवार देण्यासाठी बैठक आयोजित केली होती. जळगाव रोड वरील मराठा मंदिर सभागृहात ही बैठक नियोजित होती. या बैठकीसाठी मराठा बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. केवळ पुरुषच नव्हे तर महिला आंदोलकही एकमेकींना भिडल्या.  या बैठकीत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडून काही लोक पैसे घेऊन आले, असा आरोप मराठा समन्वयकांनी केला.

पाहा व्हिडीओ : 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts