Amravati Lok Sabha Election 2024 Bacchu kadu Prahar Party has officially announced its candidate against bjp mahayuti navneet rana Maharashtra Politics marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Amravati Lok Sabha Election 2024 :  बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा अमरावती लोकसभा (Amravati Loksabha) मतदारसंघातील माहायुती मधील डोकेदुखी काही केल्या कमी होतांना दिसत नाहीये. अशातच आता प्रहारचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या विरोधात अखेर आपला उमेदवार रिंगणात उतरविला आहे. ठाकरे गटाते नेते दिनेश बुब (Dinesh Bub) यांनी आज प्रहार पक्षात प्रवेश करत आपल्या उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा केलीय. त्यामुळे सत्ताधारी महायुतीमधून अमरावती (Amravati) मतदाहरसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना शह देण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे (Shivsena) नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) पाठोपाठ बच्चू कडू यांनी देखील आपले दंड थोपटले असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या ‘या’ बड्या नेत्याने दंड थोपटले

अमरावती लोकसभा मतदाहरसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना नुकतीच भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये अधिकृत पक्षप्रवेश केला आणि आता त्या भाजपच्या (BJP) कमळ या चिन्हावरून निवडणूक लढवणार आहेत. मात्र, महायुतीमध्ये राणांच्या उमेदवारी बाबत सुरुवातीपासून स्थानिक पातळीवर कडाडून विरोध होत होता. मात्र अमरावतीमधील स्थानिक राजकारणाचा विचार करता भाजपची उमेदवारी मिळणे हा राणा दाम्पत्यासाठी खूप मोठा विजय मानला जात होता. मात्र आता त्यांच्या विरोधात मित्र पक्षातील नेत्यांनीच आक्रमक भूमिका घेतल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग सोप्पा नक्कीच नसणार, ही स्पष्ट झाले आहे. अशातच आज अमरावती मध्ये प्रहार पक्षाने तातडीची पत्रकार परिषद घेत दिनेश बुब यांच्या उमेदवारी बाबत अधिकृत घोषणा केली आहे. सोबतच प्रहार पक्ष या निवडणुकांच्या रिंगणात आपली संपूर्ण ताकद पणाला लावणार असल्याचेही सांगण्यात आलंय.   

अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 

शिवसेनेमध्ये माझी उमेदवारी आधीच जाहीर केली होती. मात्र ती मला मिळाली नाही. लोकांचं आग्रह होता की मी प्रहार मध्ये उभं राहावं, त्यामुळे मी हा निर्णय घेतल्याचे दिनेश बुब म्हणाले. जनता खूप शुष्म निरीक्षण करत असते. पदावर कोण मस्तीत आहे, याच निरीक्षण लोकं करत असतात. आमच्या बद्दल लोकांना चांगला मत असेल तर लोकं मला मतदान करतील. या मतदारसंघात माझ्या विरोधात दोन उमेदवार आहे. तर मी तिसरा पर्याय आहे. मात्र मला विजयी केल्यानंतर लोकांनी केलेल्या कृत्याचा पश्चाताप होणार नाही, याची मी ग्वाही देतो. असेही दिनेश बुब म्हणाले.

मी वयाच्या 14-15 व्या वर्षीपासून हिंदुत्व आणि शिवसेनेसाठी काम केले. या अमरावती मधून पाचवेळा शिवसेनेचा खासदार असूनही हा मतदारसंघ पळवून नेण्यात आला. या सर्व प्रकरणाला पर्याय म्हणून बच्चू कडू यांचा खूप आग्रह होता. त्यामुळे ही निवडणूक लढवणे मला क्रमप्राप्त असल्याची प्रतिक्रिया दिनेश बुब यांनी दिली. 

प्रहारमध्ये जाहीर पक्षप्रवेश

मी सकारात्मक निवडणूक लढवणार आहे. आज मी ठाकरे गटाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना रक्तातून काढू शकत नाही आणि भगवा झेंडा घेऊनच मी पुढे जात आहे. पण मी प्रहारवर लढवावं असं सगळ्यांची इच्छा असल्याने मी हा निर्णय घेतला आहे. आज प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांच्या उपस्थितीत मी प्रहार मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केल्याची माहितीही बुब यांनी दिली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Bacchu Kadu : नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, बच्चू कडूंची घोषणा; प्रहार ठाम, महायुतीला घाम!

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts