IPL 2024 Latest Points Table: Battle for No. 1 in Chennai Super Kings and Rajasthan Royals; see Latest IPL 2024 Points Table

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL 2024 Latest Points Table: जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या इंडियन प्रीमियर 2024 सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव करून गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. राजस्थानच्या सलग दुसऱ्या विजयासह संजू सॅमसनच्या संघाचे चार गुण झाले आहेत. तर समान गुणांसह चेन्नई सुपर किंग्ज चांगल्या नेट रन रेटमुळे गुणतालिकेत अव्वल आहे. 

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील सीएसके अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. संघाने दोन सामने खेळले असून दोन्ही जिंकले आहेत. यानंतर राजस्थान रॉयल्स संघ दुसऱ्या स्थानावर आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील या संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही जिंकले आहेत. चेन्नई आणि राजस्थानचे समान गुण आहेत, परंतु नेट रन रेटमध्ये फरक आहे. चेन्नईचा नेट रन रेट 1.979 आहे, तर राजस्थानचा नेट रन रेट 0.800 आहे.

सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाइट रायडर्स, पंजाब किंग्ज, आरसीबी आणि गुजरात या संघाचे प्रत्येकी दोन गुण आहेत. या सर्व दोन गुणांच्या संघांमध्ये, केकेआरला सर्वात मोठा फायदा आहे कारण त्यांनी एकाच सामन्यात दोन गुण मिळवले आहेत, तर इतर संघांने दोन सामन्यांत दोन गुण आहेत. आज आरसीबी आणि केकेआर यांच्यात सामना आहे. आजचा सामना जो संघ जिंकेल तो थेट चार गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर जाईल.

दिल्ली, मुंबई आणि लखनौने खाते उघडले नाही-

दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि लखनौ हे तीन संघ अजून आपले खाते उघडू शकलेले नाहीत. दिल्ली आणि मुंबईने प्रत्येकी दोन आणि लखनौने एक सामना खेळला आहे. आगामी सामन्यांमध्ये कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने सामने-

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात आज बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मॅच होणार आहे. फाफ डु प्लेसिस याच्या नेतृत्त्वातील आरसीबी आणि श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वातील केकेआर यांच्यातील सामन्याकडे क्रिकेटच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. दोन्ही संघांकडे आजच्या विजयासह गुणतालिकत वरचा क्रमांक मिळवण्याची संधी आहे. आरसीबीनं आतापर्यंत दोन मॅच खेळल्या आहेत. तर, कोलकाता नाईट रायडर्सनं एक मॅच खेळली आहे. 

संबंधित बातम्या:

RCB Vs KKR Dream11 Prediction: कोहली, रसेल, मॅक्सवेल, आज तगडी फौज; पाहा परफेक्ट 11 खेळाडूंची टीम, तुम्हाला करेल मालामाल

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts